अपघातात पाच कामगार ठार

अपघातात पाच कामगार ठार

चाकण - येथील औद्योगिक वसाहतीतील खालुंब्रे (ता. खेड) गावच्या हद्दीत एचपी कंपनी ते सावरदरी रोड या रस्त्यावर केएसएच कंपनीच्या गोडाऊनसमोर झालेल्या अपघातात कारने विरुद्ध बाजूला येऊन तीन दुचाकींवरील पाच जणांना चिरडले. यात पाचही जण जागीच  ठार झाले. 

ही घटना मंगळवारी (ता. ३०) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या अपघातात चंद्रशेखर सूरजलाला विश्‍वकर्मा (वय ३८), सुनील परमानंद शर्मा (वय ४३, दोघेही रा. भोसरी) दीपनारायण हरिवंश विश्‍वकर्मा (वय २४), सत्यवान पांडे  (वय ४५), सर्वज्ञ संजय विश्‍वकर्मा (वय ३५, तिघेही  रा. मोरेवस्ती, चिखली, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे  आहेत. 

कारचालक सुहास नामदेव शेवकरी (वय २३, रा. शेवकरीवस्ती, नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.   

शवविच्छेदनास उशीर झाल्याने नातेवाईक संतप्त
पाचही जण खासगी कंपनीत एका ठेकेदाराकडे फॅब्रिकेशनचे काम करत होते. रात्री अकराला काम संपल्यानंतर ते त्यांच्या घरी दुचाकीवरून चालले होते. रात्री बाराला मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणले. पोलिसांनी पंचनामा केला. पण डॉक्‍टर शवविच्छेदन करत नव्हते. शवविच्छेदनासाठी एका मृतदेहामागे दोन हजार रुपये मागितल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सिंग यांनी केला आहे. मृताच्या नातेवाइकांनी हा प्रकार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवारांना सांगितला. मृतदेहाचे शवविच्छेदन उशिरा झाल्याने नातेवाईक, मित्र संतापले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com