पिंपरी : गाडीत गुदमरून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पिंपरी : खेळताना चुकून गाडीत अडकल्यानंतर गुदमरून आणि उन्हाचे चटके बसल्यामुळे चाकणमध्ये पाच वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. करण पांडे असे त्या मुलाचे नाव आहे.

ही घटना काल (सोमवार) सायंकाळी पावणे सहा वाजता समोर आली. काल दुपारी करण घराच्याबाहेर मित्रांबरोबर खेळत होता. दुपारी बाराच्या सुमारास परिसरात उभ्या असलेल्या एका एस्टिम गाडीत करण बसला. गाडी लॉक झाल्यामुळे त्यानंतर पावणेसहा तास तो गाडीतच अडकला होता. 

भर दुपारचे उन आणि काचाही बंद यामुळे करण गुदमरला. कडक उन्हामुळे त्याची मांडी आणि डोक्यावरील त्वचाही जळाली. सायंकाळी पावणेसहा वाजता त्याच्या वडिलांना त्याचा मृतदेह आढळला.

Web Title: Five year old boy died due to suffocation in Pimpri