ऐतिहासिक शिवनेरीसह चावंड, हडसर, जीवधनवर ध्वजवंदन

junnar
junnar

जुन्नर- ऐतिहासिक शिवनेरीसह  चावंड, हडसर व जीवधन किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने महसूल व वनविभागाच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले.
शिवनेरीवर मंडल अधिकारी रोहिदास सुपे, तलाठी प्रमोद इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद साबळे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. वनविभागाचे वतीने चावंड किल्ल्यावर वनरक्षक तृप्ती फल्ले, वनरक्षक वैभव वाजे, जीवधन किल्ल्यावर वनरक्षक विनीता वडेकर व निलेश विरणक, हडसर किल्ल्यावर वनपाल शशिकांत मडके व वनरक्षक नारायण राठोड यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले.

जुन्नर तालुका पंचायत समितीच्या आवारात सभापती ललिता चव्हाण,उपसभापती उदय भोपे,गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. यानंतर उपस्थित पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांनी तंबाखू मुक्ततेची सामुदायिक शपथ घेतली.

ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या आवारात निवासी नायब तहसीलदार रवींद्र वळवी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार शरद सोनवणे, नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक, विविथ खात्याचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस व गृहरक्षक दल तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली. यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या चहापान कार्यक्रमात विविध विकास कामाबाबत चर्चा झाली. नगराध्यक्ष शाम पांडे, मुख्याधिकारी जयश्री काटकर, नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत जुन्नर शहराचे ध्वजवंदन झाले. भारतीय जनता पक्षाचे गणेश बुट्टे पाटील व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पंचलीग झोपडपट्टीत प्रथमच ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. विविध शाळा, महाविद्यालयात तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयात ध्वजवंदन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com