Vidhan Sabha 2019 : आमचं पण ठरलंय! कसबा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार नको

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे :  पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर होताच, कसबा पेठ मतदारसंघात गटबाजी उफाळून लावली. या मतदारसंघात काँगेसचाच दुसरा नगरसेवक इच्छुक आहे. त्याला स्थानिक नगरसेवकाचा विरोध असल्याचे समजते.

'आमचं पण ठरलंय कसबा विधानसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार नको, आशा आशयाचे फ्लेक्स झळकले आहेत. तर, दुसरीकडे भाजपमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यांनाही स्थानिकच उमेदवार हवा, त्यामुळे हे फ्लेक्स भाजप की काँग्रेसच्या इच्छुकांनी लावले याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही.

Image may contain: outdoor

 4 ऑक्टोबर विधानसभा निवडणुकिसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. तरीही काँगेस - राष्ट्रवादी, भाजप शिवसेना, मनसेचे उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे 3 आणि 4 ऑक्टोबर ला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. उमेदवारांना प्रचारा साठी केवळ 15 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flex in pune against Kasaba constituency nomination in Pune