शताब्दीसह ३१ गाड्यांतून ‘फ्लेक्‍सी भाडे’ बंद होणार

Railway
Railway

पुणे - रेल्वेने पुढच्या वर्षी मार्चपासून फ्लेक्‍सी भाडे योजनेत बदल केला आहे. दुरंतो, शताब्दी आणि राजधानी एक्‍स्प्रेससह ३१ गाड्यांमधून ही सेवा बंद केली आहे. पुण्यातून सुटणाऱ्या हावडा, निजामुद्दीन आणि अहमदाबाद एक्‍स्प्रेसचा या यादीत समावेश न करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने केला आहे. 

ज्या गाड्यांमध्ये महिन्याला ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवासी असतात, अशा गाड्या या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी ज्या गाड्यांमध्ये ७५ टक्‍क्‍यांहून अधिक प्रवासी होते, त्या गाड्यांमध्ये ही योजना सुरू राहील.

प्रवासी संख्या घटल्याने तीन दुरंतो एक्‍स्प्रेस या योजनेतून बाहेर पडण्याची शक्‍यता आहे. योजनेतून वगळण्यात आलेल्या ३१ गाड्यांपैकी पुणे येथून सुटणाऱ्या पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्‍स्प्रेस गाडीचाही समावेश आहे. पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्‍सप्रेसची फेब्रुवारी, मार्च आणि ऑगस्टमध्ये प्रवाशांची संख्या कमी आहे. उर्वरित ९ महिने फ्लेक्‍सी भाडे योजनेत कमी बुकिंग होते. प्रवासी तत्काळ किंवा प्रवासाच्या १२० दिवस अगोदर तिकीट बुक करणे पसंत करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com