सुरक्षारक्षकाकडे पार्सल देणे फ्लिपकार्टला पडले महागात

FlipKart
FlipKart

पुणे - ऑनलाइन मागविलेल्या डीएसएलआर कॅमेऱ्याचे पार्सल ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांऐवजी इमारतीच्या सुरक्षारक्षाकडे देणे ‘फ्लिपकार्ट’ला चांगलेच महागात पडले. कॅमेरा गहाळ झाला म्हणून ग्राहकाला त्याचे पैसे परत करण्याचा आदेश ग्राहक मंचने दिला आहे.

गौरांगी देशमुख यांनी ४ फेब्रुवारी २०१८ रोजी फ्लिपकार्टवरून २८ हजार ९९० रुपये किमतीचा निकॉन कंपनीचा डीएसएलआर कॅमेरा मागविला होता. ऑर्डर केल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे पार्सल आले. मात्र, गौरांगी यांनी ऑर्डरचे पार्सल उघडले असता त्यात कॅमेरा नव्हता. तसेच, पार्सलचे पॅकेजिंग व्यवस्थित नव्हते. तक्रारदारांचे वडील दिलेल्या पत्त्यावर घरी होते. असे असताना पार्सल त्या राहत असलेल्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडे देण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदार यांनी फ्लिपकार्टकडे रिकामा बॉक्‍स मिळाल्याची तक्रार दिली. ९ फेब्रुवारी रोजी तक्रारदारांना कंपनीकडून फोन आला. 

संबंधित कॅमेरा शेजारील बिल्डिंगच्या सुरक्षारक्षकाकडे सापडला असून, तो त्याच्याकडून घ्यावा, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, गौरांगी यांनी पैसेच परत करण्याची मागणी केली होती. कॅमेऱ्याची रक्कम ९ टक्के व्याजाने परत करण्याबरोबरच शारीरिक व मानसिक त्रासापोटी १५ हजार नुकसानभरपाई देण्याचा आदेश मंचचे अध्यक्ष अनिल खडसे आणि सदस्य क्षितिजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी फ्लिपकार्टला दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com