esakal | मदतनिधीसाठी पिंपरीत विद्यार्थ्यांना सक्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

मदतनिधीसाठी सक्ती

अनेक शाळा पालकांकडून पैसे आणायला विद्यार्थ्यांना सांगत आहेत. काहींना खाऊ; तर काहींकडून नवीन कपडे जमा करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालक पुरते वैतागले आहेत. संस्थेने निधी गोळा जमा करण्याची सक्ती नेमकी कोणाला केली आहे. शिक्षक, प्राध्यापकांना की विद्यार्थ्यांना, ही बाबही गुलदस्तातच आहे. मात्र, शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांना सक्ती केल्यामुळे हे पावती पुस्तक संपवून पैसे शाळांकडे जमा करणे आवश्‍यक असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या पावती पुस्तकाची धास्ती घेतल्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली. जर मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍नही पालकांनी

मदतनिधीसाठी पिंपरीत विद्यार्थ्यांना सक्ती 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या शाळाप्रमुखांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठीची देणगी पावती पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती दिली आहेत. काही शाळांनी सक्ती केल्यामुळे विद्यार्थी पैसे गोळा करत वणवण भटकत आहेत. या आदेशामुळे विद्यार्थी धास्तावले आहेत. 

शहरात सहाशेहून अधिक महापालिका आणि खासगी शाळा असून 80 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यात अंदाजे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे; परंतु काही प्रसिद्धीलोलूप शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना निधी संकलित करण्याचा फतवा काढला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला 10 पावती पुस्तके विद्यालयाने दिली असून एका पावतीवर किमान 100 रुपये जमा करावे लागत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांवर ही पावती पुस्तके घेऊन वणवण फिरण्याची वेळ आली आहे. या निधीतून पूरग्रस्तांना मदत करण्याचा घाट काही शाळांनी घातला आहे. हेतू चांगला असला तरी, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना दारोदारी फिरविणे व तातडीने विद्यार्थ्यांवर जी पावती पुस्तक संपविण्याची सक्ती करणे चुकीचे असल्याच्या तक्रारी काही पालकांनी "सकाळ'कडे केल्या आहेत. 

नेमकी सक्ती कोणाला? 
अनेक शाळा पालकांकडून पैसे आणायला विद्यार्थ्यांना सांगत आहेत. काहींना खाऊ; तर काहींकडून नवीन कपडे जमा करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालक पुरते वैतागले आहेत. संस्थेने निधी गोळा जमा करण्याची सक्ती नेमकी कोणाला केली आहे. शिक्षक, प्राध्यापकांना की विद्यार्थ्यांना, ही बाबही गुलदस्तातच आहे. मात्र, शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांना सक्ती केल्यामुळे हे पावती पुस्तक संपवून पैसे शाळांकडे जमा करणे आवश्‍यक असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या पावती पुस्तकाची धास्ती घेतल्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली. जर मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍नही पालकांनी उपस्थित केला आहे. 

अपमानास्पद वागणूक 
मराठी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबांतील आहेत. अशा मुलांना ज्या वेळी पावती पुस्तक घेऊन लोकांकडे जावे लागते त्या वेळी काही लोक हाकलून लावतात; तर काहीजण अपमानास्पद वागणूक देत असतात. वास्तविक, भरमसाट शुल्क उकळणाऱ्या शिक्षण संस्थांनी तो निधी देणे आवश्‍यक असून शिक्षकांनी स्वेच्छेने एक दिवसाचा पगार द्यावा, असे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष संतोष जोगदंड यांनी म्हटले आहे; तर विद्यार्थ्यांवर शाळाप्रमुखांकडून केली जाणारी सक्ती तातडीने थांबवावी. शाळांनी मुलांना सामाजिक भानाची जाणीव करून द्यावी; परंतु अशाप्रकारे विद्यार्थ्यांची हेळसांड करू नये, अशी प्रतिक्रिया एका त्रस्त पालकाने व्यक्त केली. 
 

loading image
go to top