पिंपरी शहरात पूरस्थिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पिंपरी - शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या तिन्ही नद्यांमध्ये धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरवात झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाला काल रात्रीपासून झालेली सुरवात आणि धरणांतून सोडलेले पाणी यामुळे तिन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. 

पवना, आंद्रा, मुळशी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. कासारसाई हे मध्यम क्षमतेचे धरणही आजच्या पावसामुळे पूर्ण भरले. त्यामुळे चारही धरणांतून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरवात झाली. त्यातच धरणाच्या भिंतीपासून पुढील भागात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे ओढ्या-नाल्यांतून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत नदीच्या प्रवाहात मिसळत  आहे. 

पवना धरणातून सकाळी सहा वाजता तीन हजार ६०८ घनफूट प्रति सेकंद (क्‍युसेक) वेगाने पाणी सोडण्यात येत होते, तर दुपारी साडेतीनपासून वाढ करून पाच हजार ७२६ क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरवात झाली. कासारसाई ०.५६ अब्ज घनफूट (टीएमसी) क्षमतेचे धरण आज सकाळी पूर्ण भरले. त्यातून सकाळी सहा वाजता सहाशे क्‍युसेक, दुपारी दोनपासून एक हजार क्‍युसेक, तर दुपारी साडेतीनपासून दोन हजार क्‍युसेक पाणी पवना नदीत सोडण्यास सुरवात झाली. त्यामुळे शहरात येताना पवना नदीतील पाण्याचा वेग सुमारे आठ हजार क्‍युसेक होता. 

मुळशी धरणातूनही दहा हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने मुळा नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे.

Web Title: Flooding in the Pimpri city