पुणे-सातारा महामार्गावर पुर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

नसरापूर :  भोर तालुक्यातील केळवडे येथे डोंगरावरुन आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने पुणे सातारा महामार्गावर आज दुपारी अक्षरश: पुरजन्य स्थिती निर्माण झाली होती. रस्त्याला अक्षरश: ओढ्याचे स्वरुप आले होते. महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने तळी साचली होती. 

 केळवडे (ता.भोर) येथे आज झालेल्या जोरदार पावसाने महामार्गा लगतच्या डोंगरावरुन आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने महामार्गाचा सेवा रस्त्या पाण्याखाली गेला. मातीचा राडारोडा रस्त्यावर आल्यामुळे प्रवाशांची त्यातून वाट काढताना चांगलीच तारांबळ उडाली. लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवाशांनी महामार्ग प्रधिकरणाच्या ढिसाळ नियोजनाला यावेळी दोष दिला.

महामार्गालगतचे हाँटेल व्यवसाईक पोपटकाका जगताप तसेच केळवडेचे माजी उपसरपंच नारायण कोंडे यांनी या बाबत माहीती देताना सांगितले कि, महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजी नियोजनाचा फटका नेहमी प्रवाशांना बसतो. रस्त्याकडेला गटारांची योग्य व्यवस्था नसल्याने ही स्थिती निर्माण झाली. काही प्रवाशी जीव धोक्यात घालून या मोठ्या वाहत्या पाण्यात आपली वाहने पुढे नेत होती. या बाबत वेळीच योग्य नियोजन झाले नाही तर भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याची भिती त्यांनी व्यक्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods on the Pune-Satara highway