एम्प्रेस गार्डनमधील पुष्प प्रदर्शन कोरोनामुळे  रद्द

Flower exhibition in Empress Garden canceled due to corona
Flower exhibition in Empress Garden canceled due to corona

घोरपडी(पुणे) :एम्प्रेस गार्डन येथे ऍग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्यावतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात येत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुष्प प्रदर्शन भरवण्यात येणार नाही, अशी माहिती समितीचे सुरेश पिंगळे यांनी दिली. 

या प्रदर्शनात शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, बागेच्या प्रतिकृती, पुष्परचना तसेच विविध प्रकारच्या फुलांचा समावेश असतो. तसेच मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. देशातील विविध ठिकाणांहून आणलेले विविध प्रजातींचे गुलाब पाहण्याची संधी या प्रदर्शनात पुणेकरांना मिळत असते. पुष्प प्रदर्शनाचा आनंद लुटण्यासाठी अभ्यासक, पर्यटकांची मोठी गर्दी दरवर्षी होत असते.

ब्रिटिशकालीन बाग म्हणून ओळखले जाणारे एम्प्रेस गार्डन हे विविध वैशिष्टयांसाठी प्रसिध्द आहे. विस्तीर्ण स्वरूपात असलेल्या या बागेत विविध प्रकारची झाडे, फुले, लहान मुलांसाठी खेळणी उपलब्ध आहेत. गर्द वनराई, पक्षांचा किलकिलाट, रम्य वातावरण अशी एम्प्रेस गार्डनची ओळख आहे. लहान मुलांसाठी मोठया प्रमाणात खेळणी उपल्बध असून, मैदानी खेळ खेळण्यासाठी मुबलक जागादेखील उपलब्ध आहे. यामुळे दरवर्षी पुणेकर या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात. कोरोना मुळे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यावर मर्यादा असल्याने यंदा पुष्प प्रदर्शन भरवण्यात येणार नाही. यामुळे पुष्प प्रेमी नाराज झाले आहेत. मागील २५ वर्षापासून सुरू असलेले हे प्रदर्शन पहिल्यांदाच अशा कारणामुळे रद्द करावे लागले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com