दिवाळीत फुलांचा बाजार कोमेजला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पुणे - दिवाळीच्या सणानिमित्त मार्केटयार्डातील फूलबाजारात यंदा साधारणतः ५ कोटींची उलाढाल झाली आहे. दिवाळीत घाऊक फूलबाजारात तब्बल ७३९ टन फुलांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल दीड कोटीने घटली.

यंदा दिवाळीमध्ये तोरण, हार, लक्ष्मी पूजनासाठी झेंडू, शेवंतीसह सर्व प्रकारच्या फुलांना मोठी मागणी होती. परंतु, ऐन दिवाळीत पावसाच्या संततधारेमुळे फुलांची आवक व दर्जा घसरला होता. फूलबाजारात पुणे जिल्ह्यातील यवत परिसर, तसेच सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, बार्शी, सातारा, उस्मानाबाद भागातून फुले दाखल झाली होती. 

गेल्यावर्षीच्या तुलनेत फूलबाजारातील उलाढालीत १ कोटी ६१ लाख ७८ हजार ६२५ रुपयांनी घट झाली. यंदा बाजार समितीच्या तिजोरीत ४ लाख ८३ हजार २२ रुपयांचा महसूल जमा झाला. 

दिवाळीमध्ये झेंडू व शेवंती या फुलांना चांगला भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड करतो. या वर्षीही दिवाळीत फुलांना चांगले भाव मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, यंदा पावसाने उघडीप न दिल्याने फुलांच्या प्रतवारीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फुलांना म्हणावा तेवढा भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

फूल विक्रेते सागर भोसले म्हणाले, दिवाळीत २५ तारखेपासूनच झेंडूची मोठी आवक सुरू झाली होती. २५ ते २९ ऑक्‍टोबर दरम्यान बाजारात झेंडूची ३७२ टन, पांढऱ्या शेवंतीची १८९ टन, पिवळ्या शेवंतीची ७ टन आवक झाली. गेल्या वर्षी फूलबाजारात झेंडूची ४२१ टन, शेवंतीची १२५ टन आवक झाली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flower Market Down in Diwali