Video : यंदा फुलांचा ‘सुगंध’ पुणेकरांसाठी महाग

Flower market.jpg
Flower market.jpg

पुणे : तब्बल सहा महिन्यांनंतर मंडईत आलोय. ही मंडई येथील भाज्या, फळे, फुले, रांगोळ्या, धूप, उदबत्त्या सगळं-सगळं तसंच आहे. पण, तशीच राहिली नाहीत ती त्याची किंमत! ही किंमत किती वाढावी? दहा, वीस टक्के मान्य करतो. पण, फुलांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट व्हावा, हे मात्र अती झालं... शनिवार पेठेतील नाना जोशी कळकळीने बोलत होते...

विघ्नहर्ता श्री गणेशाचे आगमन उद्या घरोघरी होणार आहे. त्याच्या पुजेसाठी फुले, हार, फळे, केवडा, दुर्वा, उदबत्त्या, धूप, कापूर असे साहित्य खरेदीसाठी महात्मा फुले मंडई परिसरात आज सकाळ गजबजलेला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आलेल्या प्रत्येकाने मास्क, रुमाल तोंडावर बांधलेला दिसत होता. फुलांच्या दुकानाजवळ खरेदी करणारे जोशी ‘सकाळ’शी बोलतं होते.

“पाडव्याच्या खरेदीसाठी मंडईत आलो होतो. त्यानंतर आता गणपतीच्या खरेदीसाठी आलोय. पण, सगळच महागं झालंय हो. शंभर रुपयांना फक्त पावशेर फुलं. गेल्या वर्षीपेक्षा तिप्पट दर. कसं परवडेल,” असा सवाल जोशी यांनी केला. पुढच्या पानाच्या दुकानात केवडा खरेदी करणाऱया ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या, “दर वर्षीपेक्षा यंदा सगळंच खूप महाग वाटतंय. त्यामुळे परवडेल तेच आणि तेवढेच घ्यायचं असं ठरवलंय”

मंडईत भेटलेले अमोल वाघमारे असो की, ज्ञानेश्वर गोऱहे हे साठीकडे झुकलेले. त्यांनी यापूर्वीचीही वाढलेली महागाई बघीतली. पण, या वेळी महागाईचा चटका खूप जास्त बसत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. देवासाठी लागणारी फुलंही महागाहाईच्या भडक्यात होरपळी असल्याची टिप्पणी यांनी केली. 
मंडईतील फुल व्यापारी मनोज टेकाळे म्हणाले, “मालाची आवक कमी झाल्याने फुलं महागं झाली आहे. दरवर्षी दीड ते दोनशे रुपयांना विक्री होणारा हाराची किंमत यंदा तीनशे ते साडेतीनशे रुपये आहे.”  

फुलांचे घाऊक व्यापारी सुरज गिरमे म्हणाले, “मार्केटला आवक चांगली होती. पण, त्यानंतरही फुलांचे दर टिकून राहिले, याचं आश्चर्य वाटतं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत पुण्यातील फुलांची आवक 50 टक्के आहे. यात स्थानिक बाजारातील फुलांची आवक कमी आहे. झेंडूची 40 ते 50 टक्के आवक कर्नाटकातून झाली. गुलछडी, जुई ही स्थानिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फुलांचे दर तिपटीने वाढले. 

कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात येईल :  डॉ. राजेश देशमुख

फुलं (दर प्रति किलो)
जुई ................. 800 रुपये
कन्हेरी 500 रुपये किलो
गुलछडी 400 ............ रुपये 
भाग्यश्री शेवंती ... 150 रुपये
लाल झेंडू ......... 80 ते 130 रुपये
पिवळा झेंडू ...... 120 रुपये
आँस्टर प्रती जोडी ... 10 रुपये

का महागली फुलं?
लॉकडाऊनमुळे बहुतांश शेतकऱयांनी फुलं कमी लावली. त्यामुळे स्थानिक फुलं मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आली नाहीत. बंगळुर, कोलार या भागातून ही फुलं बाजारात आली. त्यामुळे फुलांचा दर वाढला. 

‘कन्हेरी’चा नवा उच्चांक
कन्हेरी फुलाची 500 रुपये किलो या दराने विक्री झाली. या फुलाचे दर आतापर्यंत तीनशे रुपये प्रतीकिलो याच्या वर कधीच गेला नाही. प्रथमच कन्हेरीला इतकी मोठी किंमत मिळाली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com