भाव नसल्याने फुले, भाजीपाला मातीमोल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

नारायणगाव - नाशिक, लासलगाव, संगमनेर, पिंपळगाव बसवंत भागातील टोमॅटोचा तोडणी हंगाम सुरू झाल्याने टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घट झाली आहे. नारायणगाव उपबाजारातील सुमारे पन्नास टक्के टोमॅटो खरेदीदार व्यापारी इतर बाजारपेठेत गेल्याने टोमॅटो खरेदीवर  परिणाम झाला. त्यामुळे बाजारभावात घट झाली आहे. मागणीअभावी भाजीपाल्याच्या बाजारभावातसुद्धा घट झाली आहे. बाजारभावाअभावी शनिवारी एक लाख कोथिंबीर, मेथी व शेपूच्या जुड्या येथील उपबाजारात सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारात टोमॅटोसह कोथिंबीर, मेथी व शेपू या भाजीपाल्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यातील टोमॅटोचा तोडणी हंगाम मार्च ते सप्टेंबर दरम्यान भरत असतो. येथील टोमॅटो उपबाजार राज्यात अग्रेसर आहे. या वर्षी उपबाजारात देशातील विविध राज्यांतील सुमारे दोनशे व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी आले होते. या वर्षी मार्च ते मे दरम्यान टोमॅटोला पन्नास रुपये ते दीडशे रुपयांच्या दरम्यान, तर जून व जुलै महिन्यात टोमॅटो क्रेटला शंभर रुपये ते चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाले. ऑगस्ट महिन्यात टोमॅटोच्या बाजारभावात घसरण सुरू झाली. सध्या येथील उपबाजारात जुन्नर, आंबेगावसह बीड, श्रीगोंदा, पंढरपूर, बारामती भागातील शेतकरी टोमॅटो क्रेट विक्रीसाठी घेऊन येत आहेत. व्यापाऱ्यांनी संगनमत केल्याने टोमॅटोच्या बाजारभावात घट झाली असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. टोमॅटोच्या बाजारभावात घट झाल्याने व्यापारी व शेतकरी यांच्यात वाद होत आहेत. 

शरद घोंगडे म्हणाले, ‘‘येथील उपबाजारात रोज कोथिंबीर, मेथी व शेपूच्या साडेतीन लाख जुड्यांची आवक होत आहे. भुरभुर पावसामुळे टोमॅटोसह भाजीपाला सडण्याचे प्रमाण वाढले आहे.बाजारभावात घट झाल्याने येथील उपबाजारात शेतकऱ्यांनी सोडून दिलेल्या जुड्या व खराब टोमॅटो जमा करण्यासाठी बाजार समितीला रोज आठ हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे.’’

नाशिक, लासलगाव, संगमनेर, पिंपळगाव बसवंत भागातील टोमॅटोचा तोडणी हंगाम नुकताच सुरू झाला आहे. यामुळे येथील उपबाजारातील खरेदीदार व्यापारी पंधरा ऑगस्टपासून इतर बाजारपेठेत टोमॅटो खरेदीसाठी गेले आहेत. ढगाळ वातावरणामुळे खराब टोमॅटो विक्रीसाठी येत आहेत. खरेदी केल्यानंतर टोमॅटोमधून पाणी सुटण्याचे प्रमाण वाढल्याने व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. यामुळे काही व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदी थांबवली आहे. मागणी नसल्यामुळे टोमॅटोच्या बाजारभावात घट झाली आहे. 
-  दत्ता शिंगोटे, व्यापारी 

Web Title: flowers, vegetable less rate in market