कौशल्य आधारित शिक्षणावर भर द्या- डॉ. एन. एस. उमराणी

ज्ञानेश्वर भंडारे
शुक्रवार, 20 जुलै 2018

वस्तू व सेवा कर संचनालयाचे सह आयुक्त रवींद्र पाटील यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जी.एस.टी. मधील तरतुदी व नवीन बद्दल याविषयी माहिती दिली.

वाल्हेकरवाडी - विद्यार्थ्यांनी केवळ पदवीसाठी शिक्षण घेऊ नये तर त्याने कौशल्य आधारित शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन.एस.उमराणी यांनी आकुर्डीतील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयात जी. एस. टी. शॉर्ट टर्म कोर्सचे उद्घाटन करतांना केले.

यावेळी व्यासपीठावर वस्तू व सेवा कर संचालनालय पुणे चे सह आयुक्त रवींद्र पाटील, संस्थेचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, दै. 'सकाळ'चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर, कोर्स समन्वयक अॅड. महेश भागवत, प्राचार्य डॉ. एम.जी.चासकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष बशीर सुतार, सुहास गारडी उपस्थित होते. पुढे बोलतांना उमराणी म्हणाले की, स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवा, सशक्त, समृद्ध पणे कौशल्य अंगीकारण्याची तयारी ठेवा, नोकरीपेक्षा स्वतःच्या उद्योग करण्यावर भर द्या. समाजातील उद्योगाच्या गरजा ओळखून पाऊल उचलले पाहिजेत. 

वस्तू व सेवा कर संचनालयाचे सह आयुक्त रवींद्र पाटील यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जी.एस.टी. मधील तरतुदी व नवीन बद्दल याविषयी माहिती दिली. संस्थेचे खजिनदार एड. मोहनराव देशमुख यांनी महाविद्यालयाचे कौतुक करून जी. एस. टी सारख्या कोर्सचे शिवधनुष्य पेलून एक आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी आशा अनेक विविध गोष्टीचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.बशीर सुतार,सुहास गारडी यांनी आपले मनोगते व्यक्त केली. तेजस्विनी पवार,सुरेश सटले, अनुजा गायकवाड, साहिद तांबोळी या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पद्मा इंगोले यांनी तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. एन. ननावरे यांनी केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Focus on skill based learning says Dr N S Umrani