बृहत्‌ आराखड्यात कौशल्य विकासावर भर

Pune-University
Pune-University

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या पाच वर्षांत कौशल्य विकास अभ्यासक्रमांची संख्या वाढविणार, सर्व परीक्षांचे निकाल ३० दिवसांत लावणार, एक लाख १० हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी प्लेसमेंट सेलची संख्या दुपटीने वाढवून ती ८५० पर्यंत नेणार, असे प्रस्ताव असलेल्या बृहत्‌ आराखड्याला विद्यापीठाकडून मंजुरी मिळाली. आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे.

विद्यापीठाच्या २०१९ - २४ या पाच वर्षांच्या बृहत्‌ आराखड्याला व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. 

आराखड्यानुसार येत्या पाच वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील रॅंकिंगमध्ये विद्यापीठाला नवव्या स्थानावरून पाचव्या स्थानी नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पुणे, नगर, नाशिकमध्ये ५८ नवी महाविद्यालये सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांनी वाढविण्यात येणार आहे. सध्या ८८२ पैकी १९० महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यमापन झाले आहे. येत्या पाच वर्षांत ४९० महाविद्यालयांचे नॅक करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘कमवा व शिका’ या योजनेचा लाभ सध्या १४ हजार विद्यार्थी घेत असून, हा आकडा ५० हजारांवर नेण्यात येईल असे विविध प्रस्ताव आराखड्यात आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.

ठळक बाबी
    दिव्यांग, विशेष मुलांसाठी महाविद्यालय सुरू करणार.
    वंचित घटकातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ५०० महाविद्यालयांमध्ये समानसंधी कक्ष.
    येत्या पाच वर्षांत ६० महाविद्यालये ॲटॉनॉमी प्राप्त करणार.
    सर्वच विद्याशाखांच्या निम्म्याहून अधिक कोर्सेसना सक्तीची इंटर्नशिप करणार.
    दरवर्षी ६८५ विद्यार्थी पीएच.डी. मिळवतात, ही संख्या दरवर्षी ९०० इतकी नेणार.
    पाच वर्षांत ५५ पेटेन्ट्‌सची नोंदणी होण्याचे उद्दिष्ट.
    इनोव्हेशन आणि इनक्‍युबेशन हबची १० केंद्रे स्थापणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com