Aero India : संपूर्ण स्वदेशी उत्पादनाचा ध्यास; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

एरो इंडियाच्या पार्श्वभूमीवर रविवारी कार्यक्रमाचे आयोजन
Focus total indigenous production Defense Minister Rajnath Singh Aero India pune
Focus total indigenous production Defense Minister Rajnath Singh Aero India punesakal

बंगळूर : एरो इंडियाचा माध्यमातून भारताची संरक्षण क्षमता जगासमोर सिद्ध करण्यात येते. स्वदेशी तंत्रज्ञान भर देत आज विविध विमानांचे वेगवेगळे भाग देशातच उत्पादित केले जात असून येत्या काळात तेजस सारख्या हलके लढाऊ विमानाचे इंजिन देखील देशातच निर्माण केले जाईल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

भारतीय हवाईदलाच्या १४ व्या एरो इंडिया या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, संरक्षण राज्यमंत्री अजय भट, संरक्षण विभागाचे सचिव अरमानें गिरीधर, कर्नाटकची मुख्य सचिव वंदिता शर्मा, भारत भूषण बाबू आदी उपस्थित होते.

यावेळी एरो इंडिया या कार्यक्रमाची माहिती देत, प्रदर्शनातील महत्वाच्या बाबी काय असतील याविषयी माहिती देण्यात आली. तसेच सिंह म्हणाले, "एरो इंडियाचा माध्यमातून जागतिक पातळीवर भारताचे इतर देशांशी संरक्षण उत्पादनाच्या बाबतीतले सहयोग वृध्दींगत होईल.

या मध्ये विविध देशातील संरक्षण अधिकारी, मंत्री, प्रतिनिधी आदी सहभाग घेणार असून केवळ संरक्षण उत्पादनाच्या करार करण्याबरोबरच विचारांचे ही आदान प्रदान केले जाणार. मंथन या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील आणि परदेशातील उद्योजक एकत्रित येऊन व्यवसाय वृध्दी करत आहेत. मित्र देशातील हवाई दलासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, करार व चर्चा यांसाठी असे व्यासपीठ महत्त्वाचे ठरतात."

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले...

- भारतला जागतिक स्तरावर महासत्ता बनविण्याच्या दिशेने संरक्षण उत्पादन क्षेत्र काम करत आहे

- भविष्यात इतर देशांना ही संरक्षण उत्पादने निर्यात करण्यात येतील

- २०२४ पर्यंत संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत भर करत २५ हजार कोटीचा टप्पा पार करण्याचा उद्देश

'एरो इंडिया'बाबत मत व्यक्त करताना ....

- यंदाचा हा कार्यक्रम भव्य असेल

- एरो इंडिया हा कार्यक्रम भारताच्या एरो स्पेस, विमानचालन आणि हवाई क्षमता सिद्ध करणारा व्यासपीठ

- यामध्यामातून उद्योग व स्टार्टअपसाठी मोठी संधी

- तरुण पिढीला यातून प्रेरणा मिळते

- कर्नाटक च्या तरुणांना याचा सर्वाधिक फायदा व त्यांना ही कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नवनवीन कल्पना सुचतील

- त्या आधारावर संरक्षण उत्पादनातील स्टार्टअप मध्ये वाढ होत यामुळे रोजगाराची संधी निर्माण होणार

कर्नाटकचे योगदान महत्त्वाचे :

देशाच्या आर्थिक उत्पन्नात कर्नाटकचा ही मोठा वाटा आहे. आयटी आणि एरो स्पेस मध्ये अग्रेसर असलेले बंगळूर हे शहर एरो स्पेस आणि विमानचालन क्षेत्रातील उत्पादनात महत्त्वाचे योगदान देत आहे. इतिहासात पण पाहिले तर हा शहर संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात पुढारलेला आहे.

येथे इस्त्रो, डीआरडीओसह.हिंदुस्तान एरोनॉटकल लिमिटेड, बोईंग, महिंद्रा एरो स्पेस, एअर बस अशा विविध कंपन्या कार्यरत आहेत. आता संरक्षण उत्पादनात योगदान असलेल्या या राज्याची ओळख आगामी काळात संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून होईल अशी शक्यता सिंह यांनी व्यक्त केली.

एरो इंडियाच्या पडदा रेझर इव्हेंटमध्ये बसवराज बोम्मई म्हणाले, 'एरो इंडिया सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी सातत्याने कर्नाटक राज्याला मिळत असल्याने ही आनंदाची बाब आहे. याचे संपूर्ण श्रेय आमच्या पूर्वजांना जाते ज्यांनी एरोस्पेस इकोसिस्टम तयार केली. कोरोना काळात ही हवाईदालने हा कार्यक्रम आयोजित करत आपली सक्षमता दाखवून दिली.

यंदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील वेळापेक्षा अधिक करार होतील अशी अपेक्षा आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेला चालना देत स्वदेशी वर भर दिला जात आहे. या पूर्वी हवाई दलासाठी लागणारी साधने ही मोठ्या प्रमाणात आयात केली जात होती. मात्र आत्मनिर्भर भारत अंतर्गत आता इस्रोच्या माध्यमातून देशातील एरो स्पेसशी निगडित आवश्यक ती उत्पादने ही ६७ टक्के कर्नाटकद्वारे पुरविण्यात येत आहेत तसेच त्याची निर्यात देखील केली जाते.

- बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री कर्नाटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com