निरवांगीच्या चारा छावणीचा नीराकाठच्या शेतकऱ्यांना आधार

nirvangi
nirvangi

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना चारा छावणीमुळे आधार मिळाला असून निरवांगीच्या छावणी हाउस फुल झाली आहे. छावणीमध्ये ३३१ शेतकऱ्यांची १२५० जनावरे दाखल झाली आहेत. गतवर्षी इंदापूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे चालू वर्षी तालुक्यामध्ये दुष्काळी तीव्रता वाढली.

तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला.तालुक्यातील नीरा नदीकाठच्या निरवांगी,खोरोची व पश्‍चिम भागातील रेडणी,दगडवाडी परीसरामध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा ही मिळणे मुश्‍कील झाले होते.तसेच जनावरांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने पाणी आणतानाही शेतकऱ्यांची दमछाक होत होती.  

सोनाई कृषी प्रक्रियेच्या माध्यमातुन पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी निरवांगीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये चारा छावणी सुरु केली.याचा पश्‍चिम भागातील व नीरा नदीकाठच्या  शेतकऱ्यांना  फायदा झाला आहे. पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांची छावणीमध्ये गर्दी झाली आहे.छावणीमध्ये ३११ शेतकऱ्यांची १२५० जनावरे दाखल झाली असून दररोज नवीन जनावरांच्या नोंदी होत आहेत.

छावणीमध्ये सोनाईच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना मुबलक पाणी व  दर्जेदार चारा देण्यात येत असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने यांनी छावणीतील शेतकऱ्यांच्या वेळोवेळी भेटी घेवून  अडचणी जाणून घेत आहेत.यासंदर्भात माने यांनी सांगितले की,तालुक्यामध्ये चारा छावणी सुरु हाेणे ही अभिमानाची गोष्ट नाही.मात्र गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी चारछावणी सुरु केल्याचे सांगितले. यावेळी निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ, दत्तू पोळ, विठ्ठल पवार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com