इंदापुरात पहिल्या चाराछावणीच्या उभारणीला वेग

indapur
indapur

वालचंदनगर (पुणे) : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या इंदापूर तालुक्यातील दुष्काळी दौऱ्यानंतर तातडीने इंदापूर तालुक्यातील पहिली चारा छावणी सुरु करण्यास वेग आला असून असून निरवांगी येथे लवकरच छावणी सुरु होणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. शेतकरी जनावरे जगविताना मेटकुटही आला आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी रविवारी (ता. 26) इंदापूर तालुक्याचा दुष्काळी दौरा केला. यामध्ये चाराछावणी सुरु करण्यासंदर्भात सूचना ही केल्या. पवार यांच्या सुचनेनंतर चारा छावणी सुरु करण्याच्या कामाला वेग आला आहे. सोनाई कृषी प्रक्रिया उद्योग समुहाने पहिली छावणी सुरु करण्यास पुढाकार घेतला आहे.

इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे चारा छावणी सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला आहे. यासंदर्भात मेटकरी यांनी सांगितले की, छावणीचा प्रस्ताव तातडीने वरिष्ठ कार्यालकडे पाठवला असून दोन दिवसामध्ये छावणी सुरु करण्याची परवानगी मिळेल. पवारसाहेबांच्या सुचनेनंतर आज (ता. 27) सोनाई उद्योग समुहाचे संचालक व जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी निरवांगी गावामधील छावणीसंदर्भात जागेची पाहणी केली. संत सोपानदेव पालखी सोहळ्याच्या मैदानामध्ये छावणी सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भात माने यांनी सांगितले की, पवारसाहेबांच्या सुचनेनूसार तातडीने  छावणी सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु केले आहेत.

नीरा नदीकाठचा भाग दुष्काळामुळे होरपळला असून या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या पाण्याची टंचाई असून या परीसरातील  नागरिकांसाठी छावणी उपयोगी पडणार आहे.सोनाई उद्योग समुह शेतकऱ्यांच्या पाठीमागे दुष्काळामध्ये गंभीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाचे युवकचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, कृषी  उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन देवकर, माजी सरपंच नाना पोळ, दिलीपराव माने, गोपाळ  रासकर, विठ्ठल पवार, दादा सुरवसे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com