धुक्‍याची चादर!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

पुणे - धुक्‍याची चादर ओढून घेतलेली मुळा-मुठा...या चादरीतून डोकं वर काढणाऱ्या वेताळ, तळजाई यांसारख्या छोट्या-मोठ्या टेकड्या...अन्‌ धुके पांघरून घेतलेले रस्ते आणि इमारती अशा ‘धुकेमय’ वातावरणाची अनुभूती लाखो पुणेकर घेत आहेत. पहाटेच्या वेळी दाट धुक्‍याची चादर शहरावर ओढल्याचे विहंगम दृश्‍य पाहायला मिळत आहे.

शहराच्या विविध भागांत सकाळी सध्या धुके पडत आहे. 
पहाटे धुक्‍याचे सौंदर्य डोळ्यांत साठविण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार बाहेर पडू लागले आहेत. 
व्यायामासाठी घराबाहेर पडणारी मंडळीही धुक्‍याचा मनमुराद आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळते. 
पाषाण तलाव, कात्रज तलाव, मुळा-मुठा नदी पात्रात धुक्‍याची ही चादर अधिक दाट असल्याचे जाणवते.

तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे १०.८  
लोहगाव १२.३  
पाषाण ११.१

गेल्या आठवड्यात हंगामातील नीचांकी ७.८ 
नव्या वर्षाच्या सुरवातीपासूनच दररोज धुके शहरात पसरल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: fog in pune