जुनी सांगवीतील वेताळ महाराज उत्सवात लावणीने रंगत

रमेश मोरे
मंगळवार, 27 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : टी.व्ही व मोबाईलच्या जमान्यात गावच्या ऊरूस यात्रेतुन लोप पावत चाललेली लोककला जुनी सांगवी येथील ग्रामदैवत वेताळ महाराज उत्सवातुन सांगवीकरांना अनुभवयास मिळाली.

जुनी सांगवी (पुणे) : टी.व्ही व मोबाईलच्या जमान्यात गावच्या ऊरूस यात्रेतुन लोप पावत चाललेली लोककला जुनी सांगवी येथील ग्रामदैवत वेताळ महाराज उत्सवातुन सांगवीकरांना अनुभवयास मिळाली.

यात्रेच्या शेवटच्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी जुनी सांगवीत "लोकरंग महाराष्ट्राचे, या प्रसिद्ध नर्तक फिरोज मुजावर व त्यांच्या सहकार्यांना पाचारण करण्यात आले होते. विस्मरणात गेलेली गण गवळण, बतावणीची ठसकेदार कॉमेडी, देवीचा जोगवा व वाघ्या मुरळीची पारंपारिक गाणी..सोबत ठसकेबाज लावण्यांनी सांगवीकरांना ठेका धरायला भाग पाडले. तर लावणीने यात्रेच्या शेवटच्या दिवशी उत्सवात रंगत आणली. या रावजी बसा भावजी, प्रितीच झुळ झुळ पाणी, बाई मी लाडाची कैरी पाडाची, येवु कशी कशी मी नांदायला अशा लावण्या फिरोज मुजावर व सहकाऱ्यांनी सादर केल्या. यावेळी त्यांच्याद्वारे अभिनयातून साकारलेले साई लिला दर्शन व स्वामी समर्थ अवतार दर्शन कलाकृतीस सांगवीकरांनी भरभरून दाद दिली.

तर पिकल्या पानाचा देठं की हो हिरावा, चोरीचा मामला या मराठी गाण्यांवर तरूणाईस ठेका धरायला भाग पाडले. कार्यक्रमादरम्यान सिने कलावंत फिरोज मुजावर यांचा सांगवीकर व उत्सव समितीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: folk dance on the occasion of vetal maharaj festival in sangavi pune