युवकांनी डॉ.बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे - हर्षवर्धन पाटील

राजकुमार थोरात
शनिवार, 28 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याचा युवकांनी आदर्श घेवून समाजाच्या प्रगतीसाठी काम करण्याची  गरज असल्याचे मत माजी सहकामंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

वालचंदनगर (पुणे) : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याचा युवकांनी आदर्श घेवून समाजाच्या प्रगतीसाठी काम करण्याची  गरज असल्याचे मत माजी सहकामंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

जंक्शन (ता.इंदापूर) येथे शनिवारी (ता.२८) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाध्ये बोलत होते. यावेळी नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, जंक्शनचे सरपंच राजकुमार भाेसले, आनंदघनचे उपसरपंच रोहित मोहोळकर, रामेश्‍वर माने, दशरथ वाघ, शिवाजी झगडे, गुणवंत पाटील, डाॅ.संजीव लोंढे, दिलीप लोहकरे, संतोष लोंढे, केशव देसाई, संजय भोसले उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे  देशातील नागरिकांना हक्क, अधिकार मिळालेले आहेत. यामुळे समाजामध्ये  समानता, सर्वधर्म समभाव निर्माण झाला आहे. 

गेल्या चार वर्षामध्ये देशामध्ये जातीय तणाव वाढला आहे. काही समाजकंठक समाजातील दोन जातीमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत असून हे धोकादायक असल्याचे सांगितले. यावेळी पाटील यांच्या हस्ते नीलध्वजारोहण करुन  महापुरुषांच्या प्रतिमेला व डाॅ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अपर्ण केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनशाम भोसले यांनी केले. सायंकाळी जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: follow the thoughts of babasaheb ambedkar said by harshawardhan patil