...म्हणून फूड डिलिव्हरी बॉईज झालेत अस्वस्थ

delivery boy.jpg
delivery boy.jpg

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पगार कपात किंवा कर्मचारी कमी करण्याचे प्रकार अनेक खासगी कंपन्यांत सुरू आहे. याच धोरणाचा फटका सध्या डिलिव्हरी बॉईजला देखील बसत आहेत. ऑर्डर पोहचवण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत कमी पैसे देण्यात येत असून पुरेशा ऑर्डर देखील मिळत नाहीत. दिवसभर काम करूनही समाधानकारक पैसे मिळत नसल्याने डिलिव्हरी बॉईज अस्वस्थ झाले आहेत.

हिंजवडी, खराडी, बाणेर आणि बालेवाडी कशा आयटी कंपन्या असलेल्या भागासह शहरातून कोरोनापूर्वी मोठ्या प्रमाणात ऑर्डर येत होत्या. मात्र, आता बऱ्याच कंपन्यातील कर्मचारी घरूनच काम करत आहेत. तर कोरोनाच्या भीतीपोटी बाहेरील खाद्य पदार्थ मागविण्याचे नागरिक टाळत आहेत. त्यामुळे ऑनलाइन जेवण मागविण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. या सर्वांचा परिणाम डिलिव्हरी बॉईजवर झाला असून पूर्वी ज्या ठिकाणी प्रत्येक ऑर्डरमागे 25 ते 35 रुपये मिळत होते आता त्यासाठी 20 ते 30 रुपये मिळत आहेत.

मर्जीतील मुलाला जास्त ऑर्डर :
कंपनीच्या धोरणांचा फटका बसायला लागल्याने डिलिव्हरी बॉईज संघटित होऊन विरोध करू लागले आहे. त्यामुळे या सगळ्यांना संघटित होण्याची प्रेरणा देणारे तसेच कंपनीच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांना कमी ऑर्डर देण्यात येत आहे. तर मर्जीतील मुलांना मात्र दिवसाला 20 ते 30 ऑर्डर देण्यात येत आहे. त्यामुळे ते दिवसाला दीड ते दोन हजार रुपये कमवत आहेत, अशी माहिती काही बॉईजने दिली.

परवडेना म्हणून काम सोडले  
पार्सल आणि ऑनलाइन डिलिव्हरी देण्यास परवानगी मिळाल्यापासून गेल्या काही दिवसांत या मुलांना दिवसाला चारशे ते सहाशे रुपये मिळत. त्यातील शंभर ते दीडशे रुपये पेट्रोलसाठी जात. शिल्लक राहणारे पैसे पुरेसे नसल्याने अनेकांनी या काळात काम देखील सोडले आहे.

  • शहरात सुमारे 25 हजार डिलिव्हरी बाईज
  • डिलिव्हरीचे अंतर व वेटिंग यावर मिळतात पैसे
  • एका ऑर्डरला सुमारे 20 ते 30 रुपये
  • टार्गेट पूर्ण करणाऱ्याला मिळतो भत्ता
  • डिलिव्हरी बाईज नुसारही ठरलेले आहेत दर 
  • पूर्वीच्या तुलनेत आता कमी पैसे मिळत आहेत
  • अनेक डिलिव्हरी बॉईजने शोधले पर्यायी काम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com