गृहिणींना दिलासा! खाद्यतेल डब्यामागे ३५० रुपयांनी स्वस्त

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे तेल खरेदी करताना सर्वसामान्यांना विचार करावा लागत होता.
Food Oil
Food OilSakal

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खाद्यतेलाच्या (Food Oil) दरात (Rate) मोठी वाढ झाली होती. त्यामुळे तेल खरेदी करताना सर्वसामान्यांना विचार करावा लागत होता. आता जागतिक बाजारपेठेसह स्थानिक बाजारपेठेत तेलाची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात मोठी घट झाली आहे. घाऊक बाजारात महिनाभरात १५ लिटरच्या खाद्यतेलाच्या डब्यामागे ३०० ते ३५० रुपयांची तर किरकोळ बाजारात (Market) किलोच्या दरात २० ते २५ रुपयांनी घट (Decrease) झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Food Oil Rate Rupees 350 Decrease)

देशात तेल उत्पादित बियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर निघाले आहे. तसेच पुढील काही दिवसात सोयाबीन आणि तेल बियांचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे देशासह इतर देशातील साठवून करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तेल विकण्यास काढले आहे. त्यामुळे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर तेलाची आवक सुरू आहे. तसेच तुलनेत मागणी कमी आहे. त्यामुळे तेलाचे दर घटले आहेत. दुसरीकडे बाजारात शेंगदाणा तेलाचे दर मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. शेंगदाणा तेलाचे उत्पादन राज्यातच होते. सूर्यफूल आणि पाम तेलाचेही उत्पादन काही प्रमाणात राज्यातच होते. मात्र सोयाबीन तेलाची इतर देशातून आयात करावी लागते, असे रायकुमार नहार यांनी सांगितले.

Food Oil
प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे दरात वाढ झाली होती. आता आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घट झाली आहे. मात्र यापुढे खाद्यतेलाच्या दरात घट होईल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे हेच दर काही दिवस टिकून राहतील, असे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले. सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे खाद्यतेलाला मागणीही चांगली असल्याचे उदय चौधरी यांनी सांगितले.

येथून होते तेलाची आवक

  • शेंगदाणा : गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र

  • सूर्यफूल : रशिया, युक्रेन

  • सोयाबीनः अर्जेंटिना, ब्राझील,

  • पामतेल : मलेशिया, इंडोनेशिया,स्वित्झर्लंड

भारतात दरवर्षी एकूण मागणीच्या सुमारे ७० टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते. तर देशात मागणीच्या ३० टक्के खाद्यतेलाची निर्मिती केली जाते. त्यामुळे खाद्यतेलांच्या दरवाढीवर मोठा परिणाम झाला आहे. परंतु, आवक वाढल्याने दरात घट झाली आहे.

- रायकुमार नहार, व्यापारी, मार्केट यार्ड

शहरातील हॉटेल्स, खानावळी, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून पाम तेलाला मागणी असते. तर घरगुती ग्राहकांकडून सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाला मागणी असते.

- उदय चौधरी, किराणा व्यापारी, मार्केट यार्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com