पुण्यात 21 विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेला खिचडीतून विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

कात्रज येथील रामभाऊ  म्हाळगी शाळेतील 22 मुलांसह एका शिक्षीकेलाही विषबाधा झाली आहे. दरम्यान, उपचारासाठी त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. उलट्या झालेल्या चार विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पुणे : कात्रज येथील रामभाऊ  म्हाळगी शाळेतील 21 मुलांसह एका शिक्षीकेलाही विषबाधा झाली आहे. दरम्यान, उपचारासाठी त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. उलट्या झालेल्या चार विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

कात्रज-  राजस सोसायटी परिसरातील  स्व. रामभाऊ म्हाळगी फाऊंडेशनच्या माध्यमिक विद्यालयामध्ये पोषण आहारात वाटलेली खिचडी भात खाऊन इयत्ता आठवी, नववी व दहावी मधील 21 विद्यार्थ्यांना मळमळ होवू लागल्यानंतर उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. उलट्या झालेल्या चार विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
     
म्हाळगी विद्यालयात बुधवारी सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना खिचडी भाताचे वाटप करण्यात आले. तत्पुर्वी संपदा किरकोळे या शिक्षिकेने नियमाप्रमाणे खिचडीभात खाऊन अर्ध्या तासानंतर विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला होता. पंधारा मिनिटांनी काही विद्यार्थ्यांना मळमळ वाटू लागली. अस्वस्थ वाटू लागलेल्या एकवीस विद्यार्थ्यांना तत्काळ भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये एक विद्यार्थी अतिदक्षता विभागात तर तीन  विद्यार्थ्यांना सलाईनवर ठेवण्यात आले आहे. सतरा विद्यार्थी जनरल विभागात उपचार घेत. या शाळेत शालेय पोषण आहारा अंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज खिचडी भात दिला जातो. आठ दिवसापूर्वी पोषण आहार वाटपाचे टेंडर बदलले आहे. रजनी महिला गृह उद्योग या महिला बचत गटाकडे सध्या पोषण आहार वाटपाचे काम आहे.
 

\''गेल्या दोन दिवसापासून खिचडीभात खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळत होत असल्याच्या तक्रारी होत्या. असून दोन दिवसांपूर्वी सुद्धा भात खाल्यावर मुलांना त्रास झाला होता. त्याचवेळी शाळेकडून कारवाई झाली असती तर आजचा गंभीर प्रसंग उद्भवला नसता'', असा आरोप पालक कैलास पाचापूरे यांनी केला आहे .खिचडीभाताला रॉकेलचा वास येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले होते.

याबाबत, भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ संजय लालवाणी म्हणाले, "खिचडी खाल्यामुळे ही विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. यामध्ये 21 विद्यार्थी आणि शिक्षीकेला विषबाधा झाली आहे.  त्यापैकी चार मुलांना उपचारासाठी अतीदक्षता विभागात दाखल केले आहे.''

अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे त्यांच्या अन्न सुरक्षा रक्षकांच्या पथकासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले, ते म्हणाले, '' मुलांनी खालेल्या खिचडीचे नमूने तपासण्यासाठी अन्न प्रयोग शाळेकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच, ज्या ठिकाणी खिचडी तयार करण्यात आली तेथे जाऊन तपासनी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food poisoning 21 students and one teacher in Pune