खाद्य पदार्थाच्या स्टाॅलला खवय्यांचा चांगला प्रतिसाद : बेनके

दत्ता म्हसकर
शनिवार, 21 एप्रिल 2018

जुन्नरला तनिष्का व्यासपीठ व तुळजाभवानी प्रतिष्ठानने लावलेल्या खाद्य पदार्थाच्या स्टाॅलला खवय्यांचा चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी केले.

जुन्नर : जुन्नरला तनिष्का व्यासपीठ व तुळजाभवानी प्रतिष्ठानने लावलेल्या खाद्य पदार्थाच्या स्टाॅलला खवय्यांचा चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी केले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवाई यात्रेत तनिष्का व तुळजा भवानी प्रतिष्ठानच्या वतीने महिला बचत गटासाठी  स्टाॅल उपलब्ध करून दिले होते.  यामुळे यात्रा उत्सवाच्या आनंदात व शोभेत भर पडली. 

या उपक्रमाचे उद्घाटन शिवाई यात्रा कमिटीचे अध्यक्ष अनिल रोकडे व वल्लभ पतसंस्थेच्या संचालिका सुधा अनील रोकडे यांच्या हस्ते तसेच शिवाई कमिटीचे सर्व सदस्य,  नगरसेविका मोनाली म्हस्के, कविता गुंजाळ, अश्विनी गवळी, तनिष्का व प्रतिष्ठानच्या सर्व संचालिका यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्टाॅलवर कच्छी दाबेली, बिर्याणी, पाणीपुरी, फिशफ्राय, फ्रुटज्यूस, असे अनेक व्हेज-नाॅनव्हेज घरगुती व पौष्टीक पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे अनेक महिलांना रोजगार व चांगल्या व्यवसायाची संधी मिळाली असे गटनेत्या उज्वला शेवाळे यांनी सांगितले. या प्रसंगी नगराध्यक्ष शाम पांडे, माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे, सरपंच संतोष केदारी, पोलीस निरीक्षक कैलास घोडके, नगरसेवक, विनायक ढोले, नरेंद्र तांबोळी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील ढोबळे  आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 

या उपक्रमास शिवाई यात्रा कमिटी, पोलीस डिपार्टमेंट, बाजार समिती, वीज मंडळ यांचे सहकार्य लाभले.. अंजली दिवेकर, राधिका कोल्हे, वैष्णवी चतुर, सुरेखा मुंढे, संगीता गोसावी, ज्योत्स्ना शिंदे,सुनीता वामन, छाया वाळुंज,  सलमा सय्यद, स्मिता मुथ्था, ज्योती गांधी, सुवर्णा वाव्हळ, छाया शेवाळे यांनी नियोजन केले. 

Web Title: Food Stall Have Good Response says Benake