फुटबॉल, सायकलिंग करणारा पासष्टीतील अवलिया | Gurmit Singh Chauhan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gurmit singh chauhan
फुटबॉल, सायकलिंग करणारा पासष्टीतील अवलिया

फुटबॉल, सायकलिंग करणारा पासष्टीतील अवलिया

पुणे - निवृत्तीनंतर अनेकदा लोक ‘ॲडव्हेंचर’ला (Adventure) आपल्या आयुष्यातून डिलीट करून टाकतात. मात्र, ‘एज इज जस्ट अ नंबर’... हे खऱ्या अर्थाने सिद्ध केलं आहे, ते ६५ वर्षीय निवृत्त पोलिसाने. (Police) गुरमित सिंग चौहान (Gurmit Singh Chauhan) यांनी वयाच्या पासष्टीतही फुटबॉल (Football) आणि सायकलिंगच्या (Cycling) राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदके जिंकली आहेत, त्यांच्या याच कामगिरीसाठी त्यांना बिहारच्या विक्रमशिला हिंदी विद्यापीठातर्फे ‘खेल शिरोमणी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मूळचे पंजाबचे असलेल्या चौहान हे पुणे ग्रामीण पोलिस दलातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचे वडील लष्करात असल्याने त्यांचा जन्म आणि संपूर्ण शिक्षण पुण्यातच झाले. त्यानंतर ते पुणे ग्रामीण पेलिस दलात रुजू झाले. लहानपणापासून खेळाची आवड असल्यामुळे त्यांनी पोलिस दलात असताना राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत सात वेळा राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

हेही वाचा: लढाई आर-पारची, आता गाफील न राहता कामाला लागा - राज ठाकरे

सेवा कार्यकाळात त्यांनी ग्रामीण पोलिस हॉकी संघाचा संघनायक म्हणून तीन वेळा जबाबदारी सांभाळली. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये त्यांना आतापर्यंत २५० हून अधिक पारितोषिके मिळाली आहेत. त्याचबरोबर ते उत्तम भांगडा ही नृत्यकला देखील सादर करतात.

पोलिस दलात असताना हॉकीसाठी राज्याचे प्रतिनिधित्व केले. निवृत्तीनंतर इतरांप्रमाणे आराम केला. खेळ खेळणे बंद झाल्याने सतत अस्वस्थता जाणवत होती. त्यामुळे पाच महिन्यांपासून दररोज ३० किलोमीटर सायकलिंग करत आहे. इंदापूर येथे मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या स्पर्धेबाबत समजताच त्यात भाग घेण्याचे ठरविले. मुंबई येथे होणाऱ्या १० मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेतही माझी निवड झाली आहे.

- गुरमितसिंग चौहान

Web Title: Football Cycling Player Gurmit Singh Chauhan Motivation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Cycling