फुटबॉलपटूंच्या हेअर स्टाइलचे आकर्षण

आशा साळवी
बुधवार, 11 जुलै 2018

पिंपरी - फुटबॉल वर्ल्डकपचा फिव्हर वाढत आहे. स्पेनचा आइसको, जर्मनीचा टोनी क्रूस, ब्राझीलचा नेमार, अर्जेंटिनाचा लिओनल मेस्सी आणि पोर्तुगालचा क्रिस्तियानो रोनाल्डो या खेळाडूंची फुटबॉल विश्‍वात हवा आहे. आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधणारे हे खेळाडू हटके हेअर स्टाइलमुळे चर्चेत असून, खेळाडूंची हेअर स्टाइल तरुणांनी डोक्‍यावर उतरवली. 

हेअर स्टाइल्स हा मुलींचा विषय हा समजच तरुणांनी मोडीत काढला आहे. भन्नाट आणि बिंधास हेअर स्टाइल्स करत, केस रंगवत तरुण स्वत:लाच स्मार्ट लुक देत आहेत. केजीपासून ते कॉलेजपर्यंतच्या सर्वच मुलांची हेअर स्टाइल बदलली आहे. विशेष म्हणजे, पालकसुद्धा या बदलत्या हेअर स्टाइल्सकडे कौतुकाने पाहत आहेत. 

खेळाडूंची हेअर स्टाइलची कॉपी अनेकांनी केली. त्यामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, डीले ब्लिंड, रहीम स्टेरलिंग, केली बकरमन, ॲसमोह ग्यान, जिरॉर्ड यांचा समावेश आहे. १८ ते २५ वयोगटातील तरुणांची संख्या यात मोठी आहे. 

थ्रीडी हेअर कट
फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत थ्रीडी हेअर कट विथ टॅटू प्रचलित आहे. या ठेवणीमध्ये मागील बाजूने केस बारीक करून त्यावर ‘फिफा’ नाव कोरून घेण्याचे फॅड वाढले आहे. या केशरचनेला आणखी उठाव देण्यासाठी रंगांचाही वापर केला जातो. फुटबॉल अथवा क्रिकेटच्या मोसमात अशी ‘हेअर स्टाइल’ ठेवण्याकडे तरुणाईचा भर असतो.

नव्या ट्रेंडनुसार हेअर स्टाइल बदलते. गुगलवरून फोटो आणून मुले दाखवतात. त्याप्रमाणे आधुनिक मशिनरी वापरून तरुण डोक्‍यावर खेळाडूंची हेअर स्टाइल करवून घेतात. 
- मंगेश राऊत, हेअर स्टायलिस्ट 

मी रोनाल्डोचा मोठा फॅन आहे. त्यामुळे त्याच्या हेअर स्टाइलची मी कॉपी केली. आमच्या मित्राच्या ग्रुपनेदेखील वेगवेगळ्या खेळाडूंची हेअर स्टाइल केली आहे.
- अनिकेत पवार, कॉलेज युवक

Web Title: football player hair style