खडकवासला धरणालगत होणार फूटपाथ

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

पुणे - खडकवासला धरणाच्या कडेने पदपथ तयार करण्यासोबत वरील भागातून होणारे प्रदूषण रोखण्यात येणार आहे. या जलाशयाच्या संवर्धनावर देखरेख ठेवणाऱ्या समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुणे - खडकवासला धरणाच्या कडेने पदपथ तयार करण्यासोबत वरील भागातून होणारे प्रदूषण रोखण्यात येणार आहे. या जलाशयाच्या संवर्धनावर देखरेख ठेवणाऱ्या समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. आमदार भीमराव तापकीर, जिल्हाधिकारी सौरभ राव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते. खडकवासला जलाशय संवर्धन कार्यक्रमांतर्गत धरणाच्या काठावरील गाळ काढणे, जलाशयातून काढलेला गाळ पड जमिनीवर टाकून ती सुपीक करणे, जलाशयाच्या सभोवती वृक्षारोपण करणे, वाढत्या नागरीकीकरणामुळे होणारे अतिक्रमण थांबविणे इत्यादींबाबत या वेळी चर्चा झाली. जलाशयाच्या वरील भागातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. ते रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. जलाशयाच्या कडेने पदपथ तयार करणे, नागरिकांसाठी पर्यटनस्थळ विकसित करणे, तसेच जल व पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

जबाबदार पर्यटन...?
एकीकडं प्रदूषण रोखण्याची भाषा करायची आणि दुसरीकडं प्रदूषण वाढेल, असे प्रकल्प आणायचे ही दुटप्पी भूमिका आहे का? पर्यटन वाढले पाहिजेच मात्र त्यासाठी नियमावलीही हवी. जबाबदार पर्यटनाची शिस्त नसेल, तर धरणासारखे महत्वाचे पाण्याचे स्त्रोत अधिक प्रदूषित होण्याचा धोका आहे. तुम्हाला काय वाटते...तुमची भूमिका मांडा...भारतात आणि जगभरात धरणांच्या क्षेत्रात देखणी पर्यटनस्थळे तुम्ही पाहिली असतील, तर त्याविषयी सांगा...

आम्हाला लिहाः webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः Tourism

Web Title: footpath proposal for Khadakwasla Dam