जवानांच्या शौर्याचा आदर व्हावा - पाटणकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

वीरपिता सुभाष कोळी यांना "वीर जिवा महाले पुरस्कार' प्रदान
पुणे - 'छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्माणासाठी युद्धनीती वापरली ती यशस्वी ठरली. कुठेतरी त्यांचे हेच तत्त्व आत्मसात करून देशाचे जवान दहशतवादाविरुद्ध लढत आहेत. स्वराज्यासाठी शिवरायांनी शौर्य गाजवले; तसेच शौर्य जवान दाखवत आहेत. त्यांच्या याच शौर्याचा आपण आदर केला पाहिजे. त्यांच्यासाठी कार्यतत्पर राहणे ही आपली जबाबदारी आहे,'' असे मत लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) यांनी मंगळवारी व्यक्त केले.

"प्रतापगड उत्सव समिती'तर्फे "शिवप्रताप दिना'निमित्त दिला जाणारा "हिंदवी स्वराज्यभूषण वीर जिवा महाले पुरस्कार' हुतात्मा जवान नितीन कोळी यांचे वडील सुभाष कोळी यांना पाटणकर यांच्या हस्ते दिला. तसेच, "हिंदुत्व शौर्य पुरस्कारा'ने सुनील देवधर यांना, तर "शिवभूषण गोपिनाथपंत बोकील अधिवक्ता पुरस्कारा'ने प्रशांत यादव यांना गौरविण्यात आले. समितीचे मिलिंद एकबोटे उपस्थित होते. या कार्यक्रमात सौरभ करडे यांचे व्याख्यान झाले. नितीन शेटे आणि त्यांच्या ऍकॅडमीच्या मुला-मुलींनी मर्दानी खेळ सादर केले, तर अशोक कामथे आणि सहकाऱ्यांनी पोवाडे सादर केले.

पाटणकर म्हणाले, ""शिवरायांचे कर्तृत्व उर भरून आणणारे आहे. कुठेतरी याच शौर्यातून प्रेरणा घेऊन जवान आणि तरुण पिढी वाटचाल करत आहे. सध्या देशासमोर सुरक्षितता हा सर्वांत मोठा प्रश्‍न आहे. पण, नितीन कोळी यांच्यासारखे जवान सीमेचे रक्षण करत असल्याने आपला देश सुरक्षित आहे. दहशतवादाला मुळासकट बाहेर काढणे हीच या हुतात्मा जवानांना खरी श्रद्धांजली असेल. दहशतवादाविरुद्ध लष्कर लढत आहे. पण, आपणही दहशतवाद संपविण्यासाठी एकत्र यायला हवे. प्रत्येकाने जवानांविषयी आत्मीयता बाळगायला हवी. त्यांचा आदर ठेवणे हेच जवानांविषयीचे खरे प्रेम असेल.''

कोळी म्हणाले, 'माझा एक मुलगा मी देशासाठी समर्पित केला. आता दुसऱ्या मुलालाही लष्करात पाठवणार आहे. तरुण पिढीने देशासाठी आपले योगदान दिलेच पाहिजे. ते कुठल्याही स्वरूपात असेल. त्यांचे हेच योगदान अभिमानाची बाब ठरेल.''

मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Forces should respect the valor