परदेशी अभ्यासकांचा चित्रपटसृष्टीकडे ओढा

Indian-Camera
Indian-Camera

सेन्सॉर केलेल्या कागदपत्रांच्या डिजिटायजेशनमुळे भारतात संशोधन करणे ठरतेय सोपे
पुणे - भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल जगभरामध्ये औत्सुक्‍य आहे. चीनमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास दर्शवणारे प्रदर्शने भरवले जाणार आहे, तर पॅरिसमध्ये राहणाऱ्या एक महिलेने अभिनेते राज कपूर यांच्यावर पीएच.डी.सुद्धा केली आहे. यातून परदेशी अभ्यासक, चित्रपट रसिकांचा संशोधनासाठी भारतीय चित्रपटांकडे ओढा असल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात काही दिवसांपूर्वी भारतीय चित्रपटांच्या सेन्सॉर केलेल्या कागदपत्रांचे डिजिटायजेशन करण्यात आले. यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीबाबत संशोधन करण्यासाठी अधिक सोयीचे झाले आहे.

चीनमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीबाबतच्या रचनात्मक बदलांबद्दलचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. चित्रपटांच्या पोस्टरद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास चीनमधील नागरिकांसमोर येईल. पुढील दोन ते तीन महिन्यांत हे प्रदर्शन भरवले जाणार असून तेथील राजदूतांनी राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाशी यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. परदेशामध्ये अनेक संशोधक पीएच.डी.चा विषयही भारतीय चित्रपटसृष्टीला अनुसरून निवडतात. याचेच एक उदाहरण म्हणजे पॅरिसमध्ये राहणाऱ्या एका महिलेने अभिनेते राज कपूर यांच्यावर फ्रेंच भाषेतून पीएच.डी. केली आहे. त्यांच्या संशोधन प्रबंधाची एक प्रत राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाकडे दिली आहे. याबरोबरच अनेक परदेशी संशोधक महिन्यातून एक ते दोन वेळा भारतीय चित्रपटांवर संशोधन करण्यासाठी येतात. भारतीय संस्कृतीतील स्त्रिया, परंपरा, गाणी, चित्रपटातील सेन्सॉर केलेली दृश्‍ये, चित्रपटसृष्टीतील ठराविक काळ अशा अनेक विषयांवर संशोधन करण्याकडे परदेशी अभ्यासकांचा ओढा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com