विदेशी कंपन्यांची तळेगावलाच पसंती 

सुधीर साबळे
बुधवार, 4 एप्रिल 2018

पिंपरी - विदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी तळेगावला पसंती दिल्याने या परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर या भागाला सोन्याचे दिवस येणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तळेगाव टप्पा दोनमध्ये चार विदेशी कंपन्यांना उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी 90.73 हेक्‍टर जमीन दिली आहे. त्यापैकी दोन कंपन्यांना मार्चमध्ये "ऑफर लेटर' देण्यात आल्याची माहिती "एमआयडी'चे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांनी "सकाळ'ला दिली. 

एमआयडीसीने तळेगावमधील टप्पा दोनमध्ये चार विदेशी कंपन्यांना जमीन दिली असून, त्यामध्ये इमर्सन, ब्रोगवॉर्ड, ज्युसी, पेरी विर्क या कंपन्यांचा समावेश आहे. पेरी विर्क कंपनी स्पेशल फ्रेमवर्क आणि स्कॅफहोल्डिंग सिस्टिमचे उत्पादन करणारी आहे. ज्युसी कंपनी फायबर ग्लासच्या उत्पादनात कार्यरत आहे. कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प एक ते दीड वर्षात सुरू होण्याची शक्‍यता आहे. नव्या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. या ठिकाणी उत्पादन प्रकल्प सुरू करणाऱ्या कंपन्या अमेरिका, जर्मनी, चीनमधील आहेत. तळेगाव टप्पा दोनमध्ये संपादित करण्यात आलेल्या जमिनीमध्ये एमआयडीसीकडून अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, हे काम येत्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. 

तळेगाव टप्पा दोनची स्थिती (हेक्‍टरमध्ये) 
- जमीन संपादन - 474.64 
- विदेशी कंपन्यांना दिलेली एकूण जमीन - 90.73 
- इमर्सन कंपनी दिलेले क्षेत्र - 21.20 
- ब्रोगवॉर्ड कंपनी दिलेले क्षेत्र - 31.15 
- ज्युसी कंपनीला दिलेले क्षेत्र - 28.38 
- पेरी विर्क कंपनीला दिलेले क्षेत्र - 10 

असा होणार विकास (हेक्‍टरमध्ये) 
- रस्ते - 83.20 
- खुल्या क्षेत्र - 40.33 
- सुविधा क्षेत्र - 30.29 
- शेतकरी परतावा क्षेत्र - 71.25 
- लॉजिस्टिक पार्क उभारणी - 10.74 
- सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग - 91 
- औद्योगिक टप्प्यातील क्षेत्र - 30.62 

""तळेगावमध्ये येत असणाऱ्या विदेशी गुंतवणुकीचा चांगला फायदा उद्योगांना होणार आहे. या कंपन्यांमुळे नवे उद्योग सुरू करणाऱ्यांना काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तळेगाव-चाकण परिसरातील औद्योगिक विकास झपाट्याने वाढत असताना तेथे पायाभूत सुविधांच्या काही अडचणी आहेत. विदेशी गुंतवणूक वाढत गेल्यानंतर या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्‍न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.'' 
- अनंत सरदेशमुख, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर 

Web Title: Foreign companies investment in Talegaon MIDC