परदेशी पाहुण्यांची ‘सकाळ’ला भेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे - तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची ख्याती जगभरात आहे. गौरी, गणेशोत्सव सणांसह पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंना भेट देत सात देशांतील परदेशी पाहुण्यांनी मंगळवारी ‘सकाळ’ मुख्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयातील गणेशाचे पूजन देखील केले. 

सर्वास इंटरनॅशनल इंडिया संस्थेच्या समन्वयातून फ्रान्स, इराण, इस्राईल, इटली, मेक्‍सिको, पोलंड आणि तुर्की या देशांतून सुमारे २६ परदेशी पर्यटक पुणे भेटीवर आहेत. १२ सप्टेंबरपासून गणेश विसर्जनापर्यंत त्यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे. त्यांनी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेतले. शनिवारवाडा, महात्मा फुले मंडई, नानावाडा, केळकर संग्रहालय, आगाखान पॅलेसदेखील पाहिला. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास बुधवार पेठेतील ‘सकाळ’ मुख्यालयात त्यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत संपादक सम्राट फडणीस यांनी केले. तसेच ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने सकाळ, ॲग्रोवन, साप्ताहिक सकाळ, सकाळ टाइम्ससह अन्य सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. या वेळी आशिया खंडातील शेतकऱ्यांसाठीचे एकमेव दैनिक ॲग्रोवन असल्याचे सांगताच त्यांनी विविध प्रश्‍न विचारत आश्‍चर्य व्यक्त करीत कौतुक केले. सकाळ कार्यालयातील गणेशमूर्तींचे पूजन करून त्यांनी निरोप घेतला. 

Web Title: Foreign guests visit Sakal office