परदेशी विद्यार्थ्यांनी जाणली पुण्याची संस्कृती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पुणे - कसबा, तांबट आळीतील पारंपरिक जीवनशैली... विशेष मुलांसमवेत तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू... खगोलशास्त्रीय केंद्र, ऐतिहासिक शनिवारवाड्याला भेट... आणि इस्कॉन टेम्पलची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहण्यासोबतच हरे रामा हरे कृष्णाच्या तालावर परदेशातून व भारताच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी ठेका धरला. पुण्याची संस्कृती व ऐतिहासिक वारसा समजून घेत सुमारे ७० परदेशी विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा या पारंपरिक वाद्यवादनाचाही मनमुराद आनंद लुटला.

लायन्स क्‍लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍ट ३२३४ डी २ तर्फे ‘इंटरनॅशनल यूथ एक्‍स्चेंज’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये १५ ते २१ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना विविध देशांतील संस्कृतीचा अनुभव घेता यावा, यासाठी देशातील ४८ युवकांना विविध देशांत पाठविण्यात आले. इतर देशांतील परदेशी विद्यार्थी भारतात आले होते. त्यांनी पुण्यात येऊन पुण्याचा इतिहास, संस्कृती जाणून घेतली. तीन दिवसीय यूथ एक्‍स्चेंज कार्यक्रमात विविध प्रकारचे उपक्रम राबवले. रवींद्र गोलर, गिरीश केळकर, गिरीश चांदेकर, मनोज बन्सल, नितीन खोंड, राजकुमार राठोड आदींनी उपक्रमात सहभाग घेतला. रमेश शहा यांनी उपक्रमाला सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी आयुका, मनोरुग्णांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारे अनुग्रह फाउंडेशनला भेट दिली. या वेळी विशेष मुलांसमवेत बसून सुंदर हस्तकलेच्या वस्तू या विद्यार्थ्यांनी बनविल्या. त्यानंतर कात्रज- कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिराला भेट दिली. जॉय ऑफ गिव्हिंग या उपक्रमांतर्गत युवकांच्या हस्ते शंकरशेठ रस्त्यावरील पिनॅकल रिक्रिएशन ॲकॅडमी येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच, पुण्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आयोजित हेरिटेज वॉक अंतर्गत शनिवारवाडा, लाल महाल, कसबा पेठ, तांबट आळी, मंडई, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर अशा विविध ठिकाणी त्यांनी भेट दिली.

Web Title: Foreign students realized the culture of Pune