परदेश दौऱ्यांचे फलित काय?

pcmc
pcmc

पिंपरी - गेल्या दोन वर्षांत दोन महापौरांनी केलेल्या दोन परदेश दौऱ्यांसाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च करण्यात आले. दौऱ्याबाबत त्यांनी दिलेल्या अहवालानुसार प्रशासनाने काहीच अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अशा दौऱ्यांचे फलित नेमके काय, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनी १४ ते १६ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत स्मार्ट सिटी एक्‍स्पो काँग्रेस परिषदेअंतर्गत स्पेनमधील बार्सिलोना येथे दौरा केला. त्यासाठी पालिकेने पाच लाख २२ हजार रुपये खर्च केले. त्यानंतर विद्यमान महापौर राहुल जाधव ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे ७ ते १० जुलै या कालावधीत झालेल्या एशिया पॅसिफिक सिटिज समिट ॲण्ड मेयर्स फोरम या परिषदेसाठी सहभागी झाले होते. या दौऱ्यासाठी पालिकेने चार लाख ८० हजार रुपये खर्च केले. या दोघांनी दौऱ्यांतून परत आल्यावर त्याचा अहवाल प्रशासनाला दिला. मात्र, त्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसते. 

बार्सिलोना येथील महापालिका कार्यक्षेत्रातील मोक्‍याच्या ठिकाणी पार्किंगच्या सद्य:स्थितीची माहिती ऑनलाइन आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून दिली जाते. रस्त्यांवरील गर्दीची व कोंडीची माहिती नागरिकांना संगणकीय प्रणालीद्वारे मिळते. त्यामुळे प्रशासनालाही कार्यवाही करणे सोपे जाते. मात्र, आपल्या शहरात पार्किंगसाठीच्या आरक्षित जागांचा विकास झाला नाही. चिंचवडगावातील जलशुद्धीकरण केंद्राजवळील पार्किंगसाठीच्या आरक्षित जागेत झोपड्या आहेत. महापालिकेने तेथे काही दिवसांपूर्वी अतिक्रमणविरोधी कारवाईही केली. मात्र, त्यानंतर तेथे पुन्हा झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. शहरात सीसीटीव्ही कार्यरत नाहीत, अशा प्रमुख चौकांची ठिकाणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांना गेल्या वर्षभरात निश्‍चित करता आलेली नाहीत.

जाधव यांनी दिलेल्या अहवालानुसार ऑस्ट्रेलियात जवळपास १४० हून अधिक बोटॅनिकल गार्डन आहेत. याउलट शहरात भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये महापालिकेने उभारलेल्या पर्यावरण उद्यानाची दुरवस्था झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com