रॉबर्ट आणि अँड्र्यूला भावले 'ढोल-ताशे'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

जर्मनीतील मागदेबर्ग येथील रहिवासी असलेले रॉबर्ट आणि त्यांचा मित्र अँड्र्यू कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून ते गणेशोत्सवाला भेट देत आहे. 

पुणे : आम्ही पहिल्यांदाच गणेशोत्सवाला भेट दिली. येथे वाजवण्यात येणारे पारंपरिक वाद्य मनाला भावणारे आहेत, अशी प्रतिक्रिया जर्मनिहून आलेल्या रॉबर्ट त्यांनी दिली. जर्मनीतील मागदेबर्ग येथील रहिवासी असलेले रॉबर्ट आणि त्यांचा मित्र अँड्र्यू कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून ते गणेशोत्सवाला भेट देत आहे. 

कर्वेनगर येथील रहिवासी असलेले शंतनु घुले हे या दोघांचे मित्र आहे. त्यांनी सकाळपासून त्यांना मनाचे गणपती आणि इतर मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीची झलक दाखवली.

अँड्र्यू म्हणाले, "संपूर्ण शहर एकाच उत्सवात रममाण झालेले मी पाहिल्यांदीच बघतोय. आम्ही या क्षणांचा मनसोक्त आनंद घेत आहे." उद्या दोघेही विसर्जन मिरवणूक संपल्यावर नर्मनीला परत जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: foreigners reaction on Ganesh Festival 2019