आठ दिवसांपासून चकवणारा तो बिबट्या अखेरीस जेरबंद

चंद्रकांत घोडेकर
Friday, 15 January 2021

चिंचोली (ता. आंबेगाव) येथील रामदास घोलप यांच्या उसाच्या शेतात असलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.

घोडेगाव : चिंचोली (ता. आंबेगाव) येथील रामदास घोलप यांच्या उसाच्या शेतात असलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. दिवसाढवळ्या हा बिबट्या याच ठिकाणी गेली 8 दिवस दर्शन देत होता. रात्रीच बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पुण्याच्या दक्षिण भागाला आता दररोज पाणीपुरवठा 

येथील कपालेश्वर एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष रामदास घोलप यांच्या घरासमोरील आपल्याच शेतात बिबट्याचे गेली आठ दिवसापासून दर्शन होत होते. चिंचोली गावाच्या उत्तरेला असणाऱ्या त्यांच्या शेतात पिंजरा लावण्यासाठी वनविभागाला विनंती करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणीवरून या ठिकाणी चार दिवसापूर्वी पिंजरा लावण्यात आला.

घोडेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी तातडीने दखल घेतली. हा बिबट्या शेतात व डांबरी रस्त्यावर पण दिसत होता. त्यामुळे ग्रामस्थ भयभयीत झाले होते. चार दिवसापूर्वी लावलेल्या या पिंजऱ्यात रात्री बिबट्या जेरबंद झाला. हा नर जातीचा बिबट्या असून अंदाजे दीड ते दोन वर्षाचा आहे. यात ग्रामस्थ, वनपाल तानाजी कदम, वनरक्षक संपत तांदळे यांनी आपल्या वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

ख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​

याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन म्हणाले, सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने बिबट्याचे निवारा क्षेत्र कमी होत चालले आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शेतात व घराजवळ वावरताना सावध होवूनच वावर करावा. बिबट्या अथवा बछडे दिसल्यास वनखात्याला कळवावे. बिबट्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असे कृत्य करू नये. वनखाते आपल्या मदतीला आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the forest department caught the leopard

Tags
टॉपिकस
Topic Tags: