वाढत्या उकाड्यामुळे तहानलेल्या प्राणी व पक्षांसाठी वन खात्याने तयार केले 64 पानवटे

रात्री प्राणी व दिवसा पक्षी पाणी पिण्यासाठी येतात
forest department make 64 water station for animal and bird pune
forest department make 64 water station for animal and bird punesakal

मंचर : वाढत्या उकाड्यामुळे पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या डोंगर, दऱ्या व जंगलात वावर असलेल्या प्राणी व पक्ष्यांसाठी आंबेगाव तालुक्यात मंचर व घोडेगाव या वनपरिक्षेत्र हद्दीत ६९ पाणवठे कार्यरत आहेत. तेथे पाणी उपलब्ध करून दिले जात असल्याने त्यांची तहान भागात आहे.

देशात सर्वाधिक बिबट प्रवण क्षेत्र आंबेगाव तालुक्यात आहे. तसेच मोर, लांडोर, तरस, कोल्हा, भेकड, लांडगा, कुत्रे,रानमांजर, माकड, वान्हार, ससा, शेखरू, सांबर, रानडुक्कर, सरपटणारे प्राणी व पक्षी यांच्यासाठी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे व मंचरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी पाणवठ्यांचे उत्कृष्ठ नियोजन केले आहे.

कृत्रिम नवीन २८,यापूर्वीचे ३९ कृत्रिम व दोन नैसर्गिक असे एकूण ६९ पाणवठे कार्यरत आहेत. “जुन्या असलेल्या पानवठ्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.वेळोवेळी गरजेनुसार टँकरद्वारे पाणी पाणवठ्यात सोडले जाते. रात्री प्राणी व दिवसा पक्षी पाणी पिण्यासाठी येतात.वनखात्याचे कर्मचारी पाणी उपलब्धतेसाठी लक्ष ठेऊन असतात.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com