निरगुडेला बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा झाला दाखल

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 15 जून 2018

जुन्नर : 'बॉम्ब वाजवा.. बिबट्या पळवा' या 'ई सकाळ' व 'सकाळ'मधील बातमीची वनविभागाने त्वरित दखल घेतली असून बिबट्याला पकडण्यासाठी काल (गुरुवार) सायंकाळी निरगुडे ता.जुन्नर येथे पिंजरा आणून ठेवला असल्याचे माजी सरपंच उर्मिला बोडके यांनी सांगितले.

भर दिवसा बोडके यांच्या घराच्या बाहेर पायऱ्यांवर तर कधी घरामागील आंब्याच्या बागेत येणाऱ्या एक बिबट्याची मादी व तिच्या बछड्यांची निरगुडे ता.जुन्नर येथे गेल्या काही महिन्यापासून मोठी दहशत झाली होती.

कधी दिवसा तर कधी सांयकाळी त्यांचा राजरोसपणे वावर वाढला असून परिसरातील ग्रामस्थ जीवितास धोका होण्याच्या भीती बाळगून सावध वावरत आहेत. परिसरातील अनेक पाळीव व भटक्या कुत्र्यांचा त्यांनी फडशा पाडला.

ग्रामपंचायतीच्या वतीने या बिबटयास पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली परंतु त्याकडे वनखात्याने दुर्लक्ष केले. दोन-तीन दिवसांपूर्वी बोडके यांच्या घराच्या कंपाउंड वरून बिबटया आला. यावेळी त्यांनी टॉर्चचा उजेड दाखवून त्यास पळवून लावले ही बाब वनविभागास वळविण्यासाठी जुन्नर गाठले पण साहेबाची भेट झाली नाही.

अखेर फोन केला तेव्हा एक कर्मचारी फटाक्यांचे बॉक्स घेऊन आला वाजविण्याचा सल्ला देऊन निघून गेला दुसऱ्या दिवशी बिबटया आवाजाने पळून गेला का याची चौकशी ही केली. पण बिबटयास पकडण्याचे नाव घेतले नाही. या बिबटयाचे बछडे आता चांगले मोठे झाले आहेत. यामुळे हे कुटुंब येथून हलविण्याचा मागणी बोडके यांनी वनविभागाकडे केली.
सकाळच्या बातमीची दखल घेत आज सांयकाळी येथे बिबटयास लालूच म्हणून सावज ठेवण्यात येणार असून आता बिबटयाची जेरबंद होण्याची प्रतीक्षा आहे.

Web Title: Forest Department provides cage to capture Leopard