विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवले; पिंजऱ्यात केले जेरबंद (व्हिडिओ)

leopards
leopards

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील फाकटे येथील गावडे वस्तीवर असणाऱ्या विहिरीत पहाटे बिबट्या पडला. बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभागाच्या मदतीने विहीरीत पिंजरा टाकून बिबट्याला जेरबंद करण्यात आले. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी वनविभागाच्यावतीने करण्यात आले होते


फाकटे येथील गावडेवस्तीवर रविवार ( ता. 14 ) पहाटे रामदास काशीनाथ भालेकर यांच्या विहीरीत शिकारीच्या शोधात बिबट्या पडला. लहान विहीर व विहीरीत असणारे पाणी यामुळे बिबट्या बाहेर पडण्याची संधी पाहत होता. विहीरीतील पाणी सिचंनाचा पाईप व दोरी यांना धरून त्याने अनेकवेळा वर येण्याचा प्रयत्न केला. विहीरीतील दोरी तटुली तर पाईप कुरतडल्याचे दिसून येत होते. यामध्ये बिबट्याच्या नख्या तुटून त्याला जखमा झाल्याचे दिसून आले. स्थानिक रहिवाशांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. कोणत्याही क्षणी हा बिबट्या उडी मारून बाहेर येईल अशी भयावह स्थीती तेथे निर्माण झाली होती.

बिबट्या विहीरीत पडल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर येथे वनविभागाचे कर्मचारी विठ्ठल भुजबळ व शिरूर तालुक्यातील रेस्क्यु टीम दाखल झाली. त्यांनी विहीरीत बिबट्या पडल्याची माहिती माणिकडोह वनविभागाला कळविण्यात आली. शिरूर वनविभाग व रेस्क्यु टीमने परिसरातील नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन केले.

माणिकडोह ( ता. जुन्नर ) येथील वनविभागाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. अजय देखमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टिमने पिंजरा विहीरीत सोडण्यात आला. पिंजरा सोडल्यानंतर दमलेल्या बिबट्याने पिंजऱ्यात तत्काळ पिंजऱ्यात प्रवेश केला. त्यावेळी वनविभागाने दरवाजा बंद करून बिबट्याला जेरबंद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com