निधी लाटण्यासाठी झाडे लावण्याचा वनविभागाचा घाट

राजकुमार थोरात
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

वालचंदनगर (पुणे) : भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे  मध्ये वनविभागाने ऑक्टोबर महिन्यामध्ये लावलेली झाडे जळून गेली असून केवळ निधी लाटण्यासाठी झाडे लावण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वालचंदनगर (पुणे) : भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे  मध्ये वनविभागाने ऑक्टोबर महिन्यामध्ये लावलेली झाडे जळून गेली असून केवळ निधी लाटण्यासाठी झाडे लावण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

चालू वर्षी इंदापूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. तालुक्यामध्ये अॉक्टोबर महिन्यामध्येच दुष्काळी परस्थिती  निर्माण झाली होती. गेल्या महिन्यापासुन नागरिक व शेतकरी पाणी टंचाई सामना करीत आहेत.  मात्र वनविभागाने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केवळ निधी लाटण्यासाठी भरणेवाडी (ता.इंदापूर) परीसरातील  माळरानावर हजारो झाडांची लागवड करण्यामध्ये व्यस्त होते. उन्हाचा तडाखा व पाण्याची कमतरता यामुळे नव्याने लागवड केलेली  झाडे जळून गेली असून झाडांच्या रोपांचा , झाडे लागवडीचा, खड्डे घेण्याचा व झाडांना पाणी  घालण्याचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

यासंदर्भात भरणेवाडीमध्ये दादा भरणे यांनी सांगितले 23 ऑक्टोबरला मी शेतामध्ये काम करीत असताना भर उन्हामध्ये वनविभागातील अधिकारी कामगाराकडून झाडे लावून घेत होते. पंधरा -वीस दिवसानंतर सदरची झाडे जळून गेली आहे. ज्या माळरानावर ऑक्टोबर महिन्यामध्ये गवत ही जळून चालले होते.त्या ठिकाणी वनविभागाने केवळ निधी लाटण्यासाठी झाडे लावण्याचा घाट घातला असल्याचे सांगितले.यासंदर्भात वनविभागाचे अधिकारी राहुल काळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रयत्न होऊ शकला नाही.  

गतवर्षीची झाडे जळाली...
वनविभागाने गतवर्षी ही भरणेवाडी परीसरामध्ये लावलेली हजारो झाडे जळून गेली असून वनविभाग केवळ निधी लाटण्यासाठी झाडे लावण्याचा उपक्रम करीत असल्याचे दादा भरणे यांनी सांगितले.

Web Title: forest department takes fund for trees