बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबाला वनविभागाकडून आर्थिक मदत

दत्ता म्हसकर
बुधवार, 28 मार्च 2018

जुन्नर - हिवरे खुर्द ता.जुन्नर येथे रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सविता वायसे ही उस तोडणी मजूर महिला गंभीर जखमी झाली होती. वनविभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी तिला उपचारासाठी ओतूर व नंतर पुणे येथे दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांचा पुणे येथील ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता. या महिलेच्या कुंटुंबाला मदत म्हणून मंगळवार ता.27 मार्च रोजी सविता वायसे यांचे पती भिमराव वायसे यांना जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या हस्ते वनविभागाच्या कार्यालयात आठ लाख रुपयाचा आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. 

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक युवराज मोहिते, वन परिक्षेत्र अधिकारी जयवंत पिसाळ, कार्यालय निरीक्षक एस. डी. काळे, सोपान डेंगळे, सुरेश कुडदुलवार, वनपाल मनिषा काळे, वनरक्षक कांचन ढोमसे आदी उपस्थित होते.  

सदर महिलेचे पती भीमराव वायसे यांनी वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी याप्रसंगात केलेल्या सहकाऱ्यां बद्दल कृतज्ञता व्यक्त केली

Web Title: forest department woman killed in a leopard attack