पारगावात बिबट्या जेरबंद

रमेश वत्रे
बुधवार, 25 जुलै 2018

केडगाव : पारगाव ( ता.दौंड ) येथील परिसरात गेल्या दहा दिवसांपासून वावरत असलेल्या बिबटयाला जेरबंद करण्यात वनखाते व ग्रामस्थांना आज यश आले आहे. बिबटया जेरबंद झाला असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले तरी आणखी एक बिबटया या परिसरात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पकडलेला बिबटया अडीच वर्ष वयाचा असून त्याला माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात आज दाखल करण्यात आले. 

पारगावमधील गलांडे-ताकवणे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर गेल्या दहा दिवसांपासून वाढला होता. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वनखात्याने येथे पिंजरा लावला होता. पिंजरा लावल्यानंतर बिबट्या हुलकावणी देत होता. काल रात्री पिंजऱ्यांची जागा बदलण्यात आली. धनाजी ताकवणे यांच्या घराजवळ पिंजरा लावण्यात आला. पिंजऱ्याच्या बाहेर व आतमध्ये कोंबडीचे मांस ठेवण्यात आले होते. मध्यरात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबटया पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे सकाळी ग्रामस्थांनी पाहिले. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली. गर्दी हटविताना वन कर्मचारी हतबल झाले. गर्दी वाढल्याने पिंजरा ताडपत्रीने झाकण्यात आला. वनखात्याची गाडी आल्यानंतर पिंजरा गाडीत ठेऊन ती माणिकडोह येथे रवाना झाली. ग्रामस्थांनी या भागात पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

या भागात बिबट्याने कुत्रे आणि शेळ्या यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. या भागात उसाची शेती मोठया प्रमाणात असल्याने बिबट्याला लपायला मोठी जागा आहे. बिबटयाच्या भीतीमुळे परिसरात शेतकरी, मजूर सुर्यास्तानंतर बाहेर पडत नव्हते. आणखी एक बिबट्याची मादी व दोन बछडे पाहिले असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. असल्याचे सांगितले. रात्रीचे वीज असेल त्यावेळी शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी जात नव्हते.

तालुका वनाधिकारी महादेव हजारे म्हणाले, बिबट्याची मोणिकडोह येथे आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्याला काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. नागपूर येथील वन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्या परवानगीने पुढील निर्णय घेण्यात येईल.

Web Title: forest officer caught leopard