महत्वाची बातमी : एमपीएससीने घेतलेल्या 'या' परिक्षांच्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर

मंगळवार, 30 जून 2020

-वनसेवेच्या मुलाखतींना सहा महिन्यानंतर योग. -जुलै, आॅगस्ट मधले वेळापत्रक जाहीर.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जानेवारी महिन्यात वन सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केले होता. आता उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती २० जुलै ते ७ आॅगस्ट दरम्यान विभागवार घेण्यात येणार आहेत. एमपीएससीने याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या ३२२ उमेदवारांच्या मुलाखतींचे वेळापत्रक पुढील प्रमाणे : पुणे : २० जुलै ते २४ जुलै, 
औरंगाबाद २७ व २८ जुलै, नाशिक ३० व ३१ जुलै, मुंबई ४ आॅगस्ट, नागपूर ६ व ७ आॅगस्ट. मुलाखतीचे स्थळ, वेळ www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच मुलाखतीसाठी येताना काय काळजी घ्यावी याबाबत उमेदवाराला पाठविल्या जाणाऱ्या पत्रात नमूद केले जाईल, असे एमपीएससीने परिपत्रकाच नमूद केले आहे. 

कोरोना मुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांना मुलाखतीच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी पास, तसेच वाहनाची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे तयारी करावी, असे आवाहन एमपीएससी स्टुडंट्स राईटसचे प्रतिनिधी महेश बडे यांनी केले आहे. 

अभियांत्रिकी सेवेच्या मुलाखती घ्या-
वन सेवेची ६ महिन्यापासून ही प्रक्रिया थांबलेली होती. ती प्रक्रिया सुरू झाली. आता आयोगाने अभियांत्रिकी सेवा यांच्या मुलाखतीचा देखील कार्यक्रम लवकर घोषित करून उमेदवारांना दिलासा द्यावा, अशी मागणी ही केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप