लॉकडाऊनमध्येही पुण्याची आयटी जोमात ! 3 महिन्यात एवढ्या कोटींची सॉफ्टवेअर केली एक्स्पोर्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत आहे. व्हिसातील बदल आणि निवडणूक यांचा थेट संबंध दिसत नसला तरी, निवडणुकीनंतरच याचा नेमका परिणाम दिसून येईल. सध्यातरी आंतरराष्ट्रीय प्रवास बंद असल्यामुळे लगेचच परिणाम होणार नाही. देशातील मोठ्या आयटी कंपन्यांनी पुढील 18 महिन्यांचा प्लॅन तयार केला असून त्यांची कामे जोरात सुरू आहेत.

पुणे : कोरोनाचा लॉकडाउन असला तरी, पुणे विभागातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून (आयटी) मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात तब्बल 18 हजार कोटी रुपयांचे सॉफ्टवेअर्स निर्यात झाली आहेत. तसेच या पुढील काळात नव्या तंत्रज्ञानामुळे आयटीमध्येच नव्हे तर, सर्वसामान्यांच्या जीवनावरही दूरगामी परिणाम होणार आहे, अशी ग्वाही पुणे सॉफ्टवेअर्स एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन मेघा यांनी गुरुवारी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाच्या तडाख्यातून आयटी क्षेत्र आता सावरत असले तरी पुढील तीन महिने आव्हानात्मक असेल. कारण आंतरराष्ट्रीय प्रवास बंद आहे. त्यामुळे ऑनसाईट काम करणे अवघड आहे. परंतु, त्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरून मार्ग काढला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. लॉकडाउनमुळे अजून 70-80 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत असून, या पद्धतीला आता ते सरावले आहेत. त्यासाठी मनुष्यबळ विकास विभागालाही आता पुनर्विचार करावा लागत आहे, असेही फोर्जहेड सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मेघा यांनी सांगितले. अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱयांना पुढील तीन ते सहा महिने घरातूनच काम करण्यास सांगितले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत आहे. व्हिसातील बदल आणि निवडणूक यांचा थेट संबंध दिसत नसला तरी, निवडणुकीनंतरच याचा नेमका परिणाम दिसून येईल. सध्यातरी आंतरराष्ट्रीय प्रवास बंद असल्यामुळे लगेचच परिणाम होणार नाही. देशातील मोठ्या आयटी कंपन्यांनी पुढील 18 महिन्यांचा प्लॅन तयार केला असून त्यांची कामे जोरात सुरू आहेत. लहान कंपन्यांना थोड्या फार समस्यांना सामोरे जावे लागत असले तरी, लगेचच नोकऱया जातील, पगार कमी होतील, अशा फारशा समस्या आयटीला भेडसावत नसल्याचे मेघा यांनी स्पष्ट केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाच्या (एसटीपीआय) संकेतस्थळावरही पुणे विभागातून 18 हजार कोटींची सॉफ्टवेअर्स निर्यात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. येत्या काळात फाईव्ह जी ची आवश्यकता भासणार असून सायबर सिक्युरिटी ही मोठा विषय असेल. सहा महिन्यांपूर्वीचा द्रोणचा वापर आता होत असलेला वापर, या मध्ये मोठा फरक पडला आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यामध्ये आजपासून नवीन नियम लागू... 

भविष्यात वाढणार 
टेलिकम्युनिकेशन, आर्टिफिशल इंटलिजन्स, बिग डाटा, ऑटोमेशन, रोबोटस, क्लाऊड कॉप्युटिंग, मोबाई टेक्नॉलॉजीस, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉक चेन आदी तंत्रज्ञान पुढच्या काळात सर्वसामान्यांचे जीवन व्यापेल. त्यातूनच शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, उद्योग, बॅकिंग, शेती आदी विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल होताना दिसतील. त्यामुळेच रिलायन्स जिआेमध्ये मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय गुंतवणूक होताना दिसत आहे, असेही मेघा यांनी सांगितले. 

कोरोनामुळे 78 टक्के लघू, सूक्ष्म उद्योगांचे काम बंद 

युवकांना संधी प्रचंड 
आयटीतील अनेक कंपन्यांमध्ये लॉकडाउनच्या काळातही रिक्रूटमेंट झाली आहे. अनेक नव्या कर्मचाऱयांनी अद्याप कंपनी बघितलेलीही नाही. आर्टिफिशल इंटलिजन्ससारख्या तंत्रज्ञानामुळे आयटीमध्ये अभिनव कल्पनांवर आधारित संगणक प्रणालींच्या निर्मितीला भरपूर संधी आहेत. त्यामुळे पुढील काळात अनेक नवे स्टार्टअप सुरू होऊ शकतात, असेही मेघा यांनी स्पष्ट केले. 

Image may contain: 1 person, close-up


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Form Pune IT 18000 crore software exports in March April May