काँग्रेसचे माजी आमदार वसंत थोरात यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुण्यातील प्रसिद्ध अखिल मंडई गणपती मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. काँग्रेसचे ते शहराध्यक्ष होते आणि ते 1974-75 या काळात पुण्याचे महापौरही होते. आणीबाणीच्या काळानंतर 1977 मध्ये त्यांना लोकसभेचीही उमेदवारी मिळाली होती. ते 1991 मध्ये आमदार झाले होते.

पुणे : काँग्रेसचे माजी आमदार वसंत विठोबा थोरात यांचे आज (गुरुवार) पहाटे अडीचच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.

पुण्यातील प्रसिद्ध अखिल मंडई गणपती मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. काँग्रेसचे ते शहराध्यक्ष होते आणि ते 1974-75 या काळात पुण्याचे महापौरही होते. आणीबाणीच्या काळानंतर 1977 मध्ये त्यांना लोकसभेचीही उमेदवारी मिळाली होती. ते 1991 मध्ये आमदार झाले होते.

वसंत थोरात यांचा सामाजिक कार्यात मोठा वाटा होता.  त्यांना महाराष्ट्रात सर्वप्रथम 1974 मध्ये झुणका भाकर केद्र सुरु केले. तसेच महापौर चषक कबड्डी स्पर्धेस सुरवात केली. शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खजीनदार म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

Web Title: former congress MLA Vasant Thorat passes away