माजी नगरसेवक दत्तात्रेय बनकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

हडपसर (पुणे) : माजी नगरसेवक दत्तात्रेय उर्फ नाना रामचंद्र बनकर (वय 79) यांचे हदयविकाराच्या झटक्याने बुधवारी पहाटे पाच वाजता निधन झाले.

हडपसर (पुणे) : माजी नगरसेवक दत्तात्रेय उर्फ नाना रामचंद्र बनकर (वय 79) यांचे हदयविकाराच्या झटक्याने बुधवारी पहाटे पाच वाजता निधन झाले.

माजी नगरसेवक सुनिल बनकर यांचे ते वडिल तर माजी महापौर वैशाली बनकर यांचे ते सासरे होत. बनकर हे 1979 ते 1997 या कालावधील हडपसर गावामधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सलग 17 वर्षे या भागाचे त्यांनी नेतृत्त्व केले. 1979 ते 1980 या कालावधित पीएमटीचे चेअरमन, 1992 ते 1997 मध्ये स्थायी समिती सदस्य आणि 1979 ते 2002 या कालावधीत सन्मित्र सहकारी बॅंकेचे चेअरमन व संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पश्चात दोन भाउ, पत्नी, दोन मुले, सूना नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: former corporator dattatrey bankar expired