'हुकूमशहासारखे वागणाऱ्या मोदींना जनता नाकारेल'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

येरवडा - जगाने हुकूमशहा हिटलर आणि एकाधिकारशाहीने वागणाऱ्या सद्दाम हुसेन यांना नाकारले आहे. त्यामुळे हुकूमशहासारखे वागणारे नरेंद्र मोदी यांनासुद्धा जनता नाकारेल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राम सोसायटीतील अतुरभवन येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या मेळाव्यात पवार बोलत होते. या वेळी खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, माजी आमदार बापू पठारे, मंगेश गोळे, ऋषी परदेशी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ""जगाच्या इतिहासात हुकूमशहा टिकले नाहीत. मात्र समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा पुरस्कार करणारे अर्थात लोकशाहीचे पुरस्कर्ते टिकले आहेत. मोदी सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता नोटाबंदीसारखा जुलमी निर्णय घेतला. सत्तेत आल्यावर महागाई कमी होईल. शेतकरी सुखी होईल, अशी खोटी आश्‍वासने देण्यात आली होती; पण एकाही गोष्टीवर त्यांनी काम केले नाही. समाजातील एकही घटक भारतीय जनता पक्ष सरकारच्या काळात सुखी नाही. सरकार कशाप्रकारे जनतेची दिशाभूल करत आहे. याचा विद्यार्थी संघटनेने पर्दाफाश करावा.''

जनतेने पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हाती सत्तेची चावी दिली म्हणून तेथे विकास करू शकलो. या शहरांशी आमची नाळ जोडलेली आहे. तेथील विकासकामांचे जनता योग्य पद्धतीने मूल्यमापन करेल, याचा विश्‍वास आहे, असेही पवार यांनी नमूद केले.

Web Title: Former Deputy Chief Minister Ajit Pawar Criticized on bjp