Vidhan Sabha 2019 : लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष अमित गवळींचा राष्ट्रवादीच्या सदस्यपदाचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : लोणावळा : लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष अमित प्रकाश गवळी यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला. वैयक्तिक कारणामुळे हा राजीनामा देत असल्याचे गवळी यांनी पत्रात म्हटले आहे.

गेल्या पंचवार्षिकमध्ये गवळी यांनी लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषवले होते. सन २०१६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अमित गवळी यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेची निवडणूक लढवली होती. नगराध्यक्षपदाच्या लढतीत त्यांच्या पत्नी शालिनी गवळी यांच्यासह राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून गवळी हे राजकारणापासून अलिप्त होते.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारात गवळी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र, सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नगराध्यक्ष पद भूषविलेले अमित गवळी यांनी अचानक राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Lonavala city president Amit Gawali resigns as NCP member