माजी आमदार लीलाताई मर्चंट यांचे निधन

former MLA Leelatai Merchant passed away
former MLA Leelatai Merchant passed away

पुणे : स्वातंत्र्यसैनिक, कॉंग्रेसच्या माजी आमदार लीलाताई रतिलाल मर्चंट (वय 95) यांचे शुक्रवारी (ता. 20) सकाळी. 7.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमित विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आहे. दोन मुली, एक मुलगा, नातवंडे असा त्यांच्या मागे परिवार आहे.

लीलाताई मर्चंट या पुण्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व होते. 1942 च्या महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या चलेजाव आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. भूमिगत राहून आंदोलनासाठी त्यांनी मदत केली. 1962 च्या चीन विरूद्धच्या युद्धात जवानांना मदत करण्यासाठी पुण्यातून उबदार कपडे, स्वेटरची मदत केली होती. तसेच पुण्यात आलेला पानशेत पुर, कोयनेचा दुष्काळ, बुरूड आळीतील आग यासह अनेक दुर्घटनांमध्ये मदत केली.

पुण्यात गुजराथी महिला मंडळ, औद्योगीक सहकारी संस्था, संयुक्त स्त्री संस्था यासह अनेक संस्थांचे काम पाहत असताना तत्कालीन खासदार स. गो. बर्वे यांनी 1962 लीलाताई मर्चंट यांनी पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी दिली. त्यानंतर त्या सलग दोन वेळा महापालिकेत निवगसेविका म्हणून निवडून आल्या. महापालिकेच्या कामात ठसा उमटविल्यानंतर 1972 मध्ये लीलाताई कसबा विधानसभा मतदारसघांतून आमदार म्हणून निवडून आल्या. विधानसभेत महिलांचे प्रश्‍न घेऊन लीलाताई लढल्या. त्यांना विधीमंडळात प्रतोद म्हणून पक्षाची उत्तमपणे बाजू मांडली. महिला आर्थिक विकास मंडळाच्या संचालिका असताना त्यांनी महिलांना शिलाई मशिन वाटल्या.

मसाला बनविण्याचे काम त्यांना दिले. 1974 मध्ये पुण्यात जिजामाता सहकारी बॅंक स्थापन करण्यात व त्यासाठी शेअर जमा करण्याची महत्वाची जबाबदारी लीलाताई यांनी पार पाडली होती. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानीत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com