मानले पाहिजे राव, 26 कोरोनाग्रस्तांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या 'त्या' माजी संरपंचाची स्टोरी एकदा वाचाच

मानले पाहिजे राव, 26 कोरोनाग्रस्तांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या 'त्या' माजी संरपंचाची स्टोरी एकदा वाचाच

पारगाव : पारगाव (ता. आंबेगाव) येथील एकाचा काल बुधवारी कोरोनोमुळे मृत्यू झाला, मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी मंचर गावाबाहेर पारगाव येथे जाऊन त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्याने गांजाळे यांच्या माणुसकीचे दर्शन पारगावकर ग्रामस्थांना झाले. गांजाळे यांनी आतापर्यंत एकुण 26 कोरोनोग्रस्त मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले आहे.

कोरोनाच्या संसर्गाने कधी कधी घरातील सर्वच व्यक्तींना घेरलेले असते सर्वजण दवाखाण्यात उपचार घेत असताना त्यापैकी एकांद्याचा दुर्देवी मृत्यु झाल्यास त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास कोणीच नसते नातेवाईकही पुढे येत नाही अशा प्रसंगी दत्ता गांजाळे स्वताची पर्वा न करता पुढे येऊन अंत्यसंस्कार करु लागले त्यांना काही मित्रमंडळींची साथ मिळत आहे.

मंचर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात संपुर्ण तालुक्यातुन तसेच शेजारच्या जुन्नर तालुक्यातुनही अनेक कोरोनोबाधीत उपचारासाठी दाखल होतात. त्यापैकी एकांद्याचा दुर्देवी मृत्यु झाल्यास त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मुळगावी नेणे शक्य नसते अशावेळी मृत व्यक्तींचे नातेवाईक असो अथवा नसो गांजाळे स्वत: सर्व विधींचा सोपास्कार करतात.

काल बुधवारी तपनेश्वर स्मशानभुमीत चार अंत्यसंस्कार करण्यात आले. पाचव्या कोरोनोग्रस्ताचा व्यक्तीचा मृत्यू झाला. ती व्यक्ती पारगाव येथील होती. तपनेश्वर स्मशानभुमीतही जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांचा अंत्यविधी त्यांच्या जन्मभूमी पारगावच्या स्मशानभुमीत करण्याचा निर्णय घेतला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक सागर गायकवाड तसेच गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्या सहकार्याने विधी गावात करता आला. दत्ता गांजाळे त्यांचे तरुण सहकारी महेश घोडके, अक्षय चिखले, सुरज धरम, आकाश मोरडे, राहुल थोरात, जयेश भालेराव, स्वप्निल लोखंडे व रुग्णवाहिका चालक गौरव बारणे, ग्राम पंचायत सदस्य किरण ढोबळे, बाजीराव देवडे इत्यादींनी सहकार्य केले. आत्तापर्यंत दत्ता गांजाळे यांनी एकुण 26 कोरोनोग्रस्त मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com